Chandane Swaranche (चांदणे स्वरांचे) By Rekha Chavre Jain
Chandane Swaranche (चांदणे स्वरांचे) By Rekha Chavre Jain
Share
Author:
Publisher: Utkarsh Prakashan
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
Chandane Swaranche (चांदणे स्वरांचे)
Author : Rekha Chavre Jain
"चांदणे स्वरांचे" हा आशाताईंवरील गौरव ग्रंथ उत्कर्ष प्रकाशन तर्फे देखण्या स्वरूपात सिद्ध होत आहे. या पुस्तकाचे संकलन संपादन प्रसिद्ध मंगेशकरकुटुंबभक्त संपादक रेखा चवरे जैन यांनी केले आहे. यापूर्वी त्यांची मंगेशकर कुटुंबा वरील बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. ग्रंथाला माननीय शरद पवार साहेबांची प्रस्तावना लाभली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सुंदर लेख यात समाविष्ट आहेत केंद्रिय मंत्री माननीय नितीनजी गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित सत्याशील देशपांडे , मीनाताईंची कन्या रचना शहा, सुदेश भोसले, विदुषी श्रुती सडोलीकर काटकर, दुबईचे मसाला किंग धनंजय दातार, जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सुधीर गाडगीळ, गायक अतुल अरुण दाते, हृदयेश आर्टस् चे अविनाश प्रभावळकर, वादक रमाकांत परांजपे, विवेक परांजपे, निवेदक अरुण नूलकर, ऱ्हिदम वाघोलीकर, गायिका उत्तरा केळकर, प्रख्यात आर्किटेक आणि इंटिरियर डिझायनर केतन गाडगीळ,पत्रकार राजीव विजयकर अशा मान्यवरांचे ५० लेख आहेत. विशेष म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी अत्यंत सुंदर सखोल असा लेखही ग्रंथासाठी लिहून दिला आणि ग्रंथाला शुभेच्छा ही दिल्या आहेत.
पुस्तकाची किंमत रु.५००
वाचकांसाठी खास सवलतीत रु. ४०० मध्ये
सवलत मर्यादित कालावधीसाठी.