{"product_id":"chandrasakshi","title":"Chandrasakshi (चंद्रसाक्षी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचंद्रसाक्षी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रारब्ध कितीही कसोटी पाहत असलं तरीही एखादी स्व-तंत्र माणूसपणाच्या वाटेवरची स्त्री आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करते आणि तिच्या अस्तित्वाला एक लोभस पालवी फुटते. रूढिप्रिय समाज मात्र सहजासहजी हा बहर पचवू शकत नाही. त्यातच अशा ध्येय-स्वप्नांच्या वाटेवर तिला एखाद्या पुरुषाचे मैत्र मिळाले तर त्या नात्याला प्रश्नचिन्ह लागते. तिने नवी वाट चोखाळणं, हे बहुतांश वेळा शोकांतिकाच ठरतं. नियतीदत्त निरस संसारातून अलिप्त होत, आपल्या स्वप्नांमागे धावताना चहू दिशांनी विद्ध झालेल्या दिशा नामक स्त्रीची ही कहाणी- चंद्रसाक्षी. दिशाचा भवतालच तिला शबल करू पाहतो. तिला हतोत्साहित करून टाकतो. मानवी जीवनातील बहुआयामी जाणीवा अनुभवण्याची तिची स्वतंत्र ऊर्मी कोमेजून जाते. ख्यातनाम लेखिका उर्मिला शिरीष यांच्या गाजलेल्या कलाकृतीचा हा मराठी अनुवाद केलाय उमा देशमुख यांनी. मूळ कादंबरी इतकाच प्रवाही, उत्कट आणि रंजक असा ! मराठी वाचकांसाठी हा एक वेगळा नजराणा दिल्याबद्दल उमा देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. उर्मिला शिरीष \u003cbr\u003eअनुवादित लेखक. डॉ. उमा केवळराम - देशमुख \u003cbr\u003eप्रकाशक. अनुबंध प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52733882794306,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChandrasakshiF.jpg?v=1774347853","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chandrasakshi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}