{"product_id":"chhatrapati-shivaji-maharaj-va-ingraj","title":"Chhatrapati Shivaji Maharaj Va Ingraj  (छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eछत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया भूमीस सातासमुद्रापलीकडून आलेल्या युरोपियन लोकांचा भविष्यात होऊ घातलेला धोका ओळखून त्यावर अंमल करणारे तत्कालीन एकमेव भारतीय सत्ताधीश हे छत्रपती शिवाजी महाराज होते. .. शिवाजी महाराज हे या पुढारलेल्या नौदलधारी पाश्चिमात्त्यांना रोखण्याचा केवळ विचार करून थांबले नाहीत तर त्यांचा सरळसरळ सामना करण्यासाठी सागरात प्रत्यक्ष आरमार उभारून धाक निर्माण केला. सदर पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यातील व्यापारी संबंध, इंग्रजांनी पत्रांतून रेखाटलेल्या शिवाजी महाराजांच्या हालचाली, इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध घेतलेल्या भूमिका, महाराजांच्या स्वाऱ्यांदरम्यान इंग्रज वखारींना बसलेले धक्के, इंग्रज व शिवाजी महाराज यांच्यात झालेले तहाचे प्रयत्न, इंग्रजी दूतांचे रायगडावरील आगमन, शिवाजी महाराज व जंजिऱ्याचा सिद्दी यांच्यातील संघर्षात इंग्रजांचे दुटप्पी वर्तन, शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यात उद्भवलेला नाविक संघर्ष, शिवाजी महाराजांच्या मुघल, आदिलशहा, पोर्तुगीज, डच यांच्यासोबत आलेल्या संबंधात इंग्रजांची भूमिका व दृष्टिकोन अशा विविध बाबींचे विवेचन करण्यात आले आहे. मराठी वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्या परस्पर संबंधांविषयी अधिक माहिती मिळावी या हेतूने या पुस्तकाचे लेखन केले आहे. या विषयावर सखोलपणे प्रकाश टाकणारे अशा प्रकारचे मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. संदीप आबाराव ठाकरे \u003cbr\u003eप्रकाशक. मर्वेन टेक्नॉलॉजीज\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52816909697346,"sku":null,"price":472.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChhatrapatiShivajiMaharajAaniIngrajF.jpg?v=1774676427","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chhatrapati-shivaji-maharaj-va-ingraj","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}