Akshardhara Book Gallery
Chhotyancha Motha Plan ani Itar Goshtee ( छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी )
Chhotyancha Motha Plan ani Itar Goshtee ( छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी )
Share
Couldn't load pickup availability
Author: Mugdha Shewalkar-Manerikar
Publisher: Rajhans Prakashan
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
छोट्यांचा मोठा प्लॅन आणि इतर गोष्टी
जे बालसाहित्य मुलांना वाचायला आवडते, पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, ते उत्तम बालसाहित्य. असे बालसाहित्य लिहिण्यासाठी मुलांचे मन वाचता येणे आणि ते अचूकपणे शब्दांत मांडता येणे फार अवघड आहे. पण ही अवघड गोष्टच अगदी सोप्या पद्धतीने मुग्धा शेवाळकर करतात. त्यांच्या ‘निसर्गातले सखेसोबती' या पुस्तकातून त्याचा प्रत्यय आपल्याला येतोच. लेखन, अनुवाद आणि पुस्तकवितरण क्षेत्रात कार्यरत असणार्या आणि खास करून मुलांसाठी विविध वृत्तपत्रांतून लेखन करणार्या मुग्धा शेवाळकर छोट्या दोस्तांच्या भेटीला आल्या आहेत नवीन बालकथासंग्रह घेऊन! ही भेट मुलांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार. या सर्वच गोष्टी मुलांच्या भावविश्वाशी सांगड घालणार्या, मुलांच्या भाषेतून अवतरणार्या, उपदेशपणा बाजूला सारणार्या आणि आनंदासोबतच नकळत मूल्यसंवर्धनही करणार्याही आहेत. म्हणूनच या गोष्टींचे मोल बालसाहित्यात अनमोल आहे ! - एकनाथ आव्हाड साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
