{"product_id":"chipta-mapta","title":"Chipta Mapta (चिपटं मापटं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचिपटं मापटं \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचिपटं मापटं - झुंजणाऱ्या माणसांच्या कथा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e महाराष्ट्राचा पश्चिम विभाग समृद्ध आहे. काळीभोर जमीन आहे, अगदी सोळा आणे जरी नसला तरी बारा आणे तरी पडणारा पाऊस आहे, साखर कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजकारणी मंडळी आहेत, सगळे आहे. तरीही या भागातल्या खेड्यातल्या लोकांचे जीवन सुखी होते, सुखी आहे असे म्हणायला जीभ कचरते. एकतर अजूनही त्या भागातल्या बऱ्याच लोकांचा व्यवसाय शेती आहे. आता परिस्थिती जरा सुधारली, पण अगदी कालपरवापर्यंत बारमाही पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी तसे कमीच होते. त्यामुळे शेतीचे उत्पन्न बेभरवशाचे होते. पारंपरिकता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, अडाणीपणा, 'लोक काय म्हणतील' हा विचार असल्या सगळ्यामुळे सामाजिक आयुष्यात मागासलेपण फार होते. बऱ्याच लोकांचे आयुष्य झगडण्यात, खस्ता खाण्यातच जात असे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'चिपटं मापटं' या कथासंग्रहांतील कथा अशाच गांजलेल्या माणसांच्या कथा आहेत. माणसाच्या विरोधात नेहमी दुसरा एखादा माणूसच असतो असे नाही. माणसाच्या पुढे कधीकधी समज असतो तर कधी समाज असतो, कधी निसर्ग असतो तर कधी नियती असते. या सगळ्यांशी झटे घेत, धडपडत माणूस जगण्याचा प्रयत्न करत असतो. तो कधी जिंकतो तर कधी हरतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा लोकांच्या जगण्याचे, झगडण्याचे, जिंकण्याचे, हरण्याचे सार हे शेर-पायलीत मोजता येण्याइतके नसते. ते चिपट्या-मापट्यात मोजण्याएवढेच असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणून 'चिपटं मापटं'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :डॉ.संजीव कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951067124034,"sku":null,"price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChiptaMaptaF.png?v=1783145140","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chipta-mapta","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}