{"product_id":"chirebandee","title":"CHIREBANDEE  (चिरेबंदी)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eचिरेबंदी\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरवींद्र पिंगे गेली चाळीस वर्षं सातत्याने घाटदार ललितलेखन करीत आहेत. व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, स्थळवर्णन, अभिजात साहित्यकृतींचं रसग्रहण, मनस्वी पाश्चात्य साहित्यसेवकांच्या कर्तृत्त्वाचं निरूपण, स्तंभलेखन आणि कोकणी जीवनाचं जिवंत चित्रण अशा अनेक अंगांनी त्यांच्या लेखनऊर्जेला वाटा मिळाल्या आहेत. फापटपसारा टाळून थेट आशयाला भिडणं आणि पवित्रा न घेता चपखल शब्दांत वास्तव चितारणं हे पिंगे ह्यांच्या अल्पाक्षरी लेखणीचं वैशिष्ट्य आहे. कुणाचाही न्याय करणं नाही, खांद्यावर कसलंही निशाण वाहणं नाही आणि अवसान आणणं नाही ही पिंगे ह्यांच्या लेखणीची खासियत आहे. अखंड भ्रमण आणि चौफेर व्यासंग ही त्यांची दोन वल्ही आहेत. असा त्यांच्या लेखनतारूचा प्रवास अव्याहत सुरू आहे. एका बाजूला नियती व निसर्ग आणि दुसऱ्या तीरावर माणूस, ह्यांच्यातला खेळ पाहणं आणि रंगवणं हे लेखक म्हणून आपलं काम आहे असं पिंगे मानतात. लेखणीने त्यांना लेखनप्रांतातले अनेक मानसन्मान मिळवून दिले आहेत. रवींद्र पिंगे ह्यांच्या शैलीसंपन्न आणि चिरेबंदी ललितलेखनाचा हा एक संस्मरणीय संग्रह आहे.\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : रवींद्र पिंगे \u003cbr\u003eप्रकाशन : अनुभव प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52304051634498,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/cherebandi-f.jpg?v=1773661658","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chirebandee","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}