{"product_id":"chitra","title":"Chitra (चित्रा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eChitra (चित्रा)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'चित्रा' ही अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीविश्वातली सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. एस. टी. स्टॅण्डवर भेटलेल्या चित्रा व तिचा मामा कृष्णा यांच्या भेटीवर बेतलेली वास्तव व तितकीच मनाला भुरळ घालणारी आशयसंपन्न अशी ही कादंबरी आहे. 'चित्रा' ही गरीब घरची मुलगी मामाच्या आधाराने आई, बहीण व ती राहत असते. मामा तिची मोठी बहीण सोनाला मुंबईला नेऊन दलालाला विकतो. ती वेश्या बनते. आपल्या आईचे व बहिणीचे हाल होऊ नयेत म्हणून सोना मामाला पैसे देते नि चटावलेला मामा चित्राच्या चारित्र्यावर आळ घेत तिलाही मुंबईला सोनाकडे आणतो. चित्राच्या वाट्याला आलेली मुंबईतली पुरुषी पशुवृत्तीची माणसं, त्यातलाच एक कांतीलाल शेठ आपल्या प्रतिष्ठेखातर आपल्यातलं नपुंसकत्व लपवत तिच्याशी लग्न करण्याचा निश्चय बोलून दाखवतो. नवरा म्हणून राहून दुसऱ्याची शेज सजवायची मुभा देणाऱ्या स्वार्थी, वाघासारखा दिसणाऱ्या, पण नखं नसणाऱ्या बोचऱ्या वेदना काळजाला चरे पाडणाऱ्या आहेत. त्या दलदलीतलं घृणास्पद जगणं जगत ती या साऱ्यांशी संघर्ष करत त्यातून आपली सुटका करून घेते. “तू जग नि तुझ्या अब्रूची होळी करणाऱ्या जगाची होळी होईपर्यंत जग, एवढंच माझं तुला सांगणं आहे.\" असं सोनाला ती का म्हणते? तिच्यातल्या धैर्यशीलतेचं यथार्थ चित्रण म्हणजे अन्यायाशी कडवी झुंज जरी असली तरी समाजातल्या कैक चित्रांचा आकांत आजही समाजातली ही विकृती मुस्कटदाबी करते आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अण्णा भाऊ साठे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eहॅण्डलिंग चार्जेस -५० रुपये \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67754108911938,"sku":"GOVE0025","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/chitra-f.jpg?v=1792043312","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chitra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}