{"product_id":"chittar-bittar","title":"Chittar Bittar (चित्तर बित्तर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचित्तर बित्तर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुम्ही जसे जगाकडे बघता, जग तसे दिसायला लागते. बहुतांश लोकांच्या दुर्भागी डोळ्यांना जगण्यातले फक्त कुरूप दिसते. कसे कोणास ठाऊक सारिकाच्या डोळ्यांना मात्र फक्त प्रसन्नता आणि अपार कुतूहलच दिसत राहते आणि त्या सगळ्याच्या गोष्टी सारिका सांगत राहते. 'चित्तर-बित्तर'मध्ये सारिकाने चितारलेली माणसे ही काही कोणी लार्जर देंन लाइफ नायक-नायिका नाहीत, त्यांनी काही आकाशाला गवसणी वगैरे घालायचे पराक्रमही केलेले नाहीत. तरीही त्यांची गोष्ट सारिका का सांगत असावी ? तुमच्या-माझ्या आयुष्यातही 'चित्तर-बित्तर'मधील ही माणसे आपल्या गोष्टी घेऊन नक्की आली होती, पण आपण कुतूहलाच्या डोळ्यांनी त्यांच्या जगण्याकडे बघितलेच नाही. सारिकाचे नायक-नायिका जसजसे उलगडत जातात तसतसे, अरे किती छान पद्धतीने ह्या जगण्यातल्या नाटकाकडे सारिकाला बघता येते आहे ह्याने अचंबित व्हायला होते आणि आपणही कुतूहलाने आता आपल्या वाट्याला येणाऱ्या लोकांकडे पाहिले पाहिजे असे वाटू लागते. वाचकाला आपल्या जगण्यात आपण बदल करायला हवाय की काय असा प्रश्न क्षणभर पडला तरी ते लिखाण सार्थक ठरते, जे सारिकाला निःसंशय साधले आहे. को हं! ह्या सनातन गंभीर प्रश्नानंतर विद्वत्तापूर्ण हताशा चेहऱ्यावर वागवून आपल्याला फिरावेसे वाटेल तेव्हा सारिकाचे लिखाण को हं! ह्या प्रश्नाला खदखदून हसून, मला नाही माहीत, सापडेल कधीतरी! पण तोपर्यंत धमाल करायला काय हरकत आहे? असा भाव बाळगत फिरणाऱ्या लठ्ठ हॅप्पी मॅनसारखे आपल्यासमोर येऊन वाकुल्या दाखवेल आणि आपल्याला पुन्हा पुन्हा एकूण जगण्यातील प्रसन्नतेचे तुकडे गोळा करत राहण्याची आणि त्यांच्याच गोष्टी रंगवून सांगण्याची आठवण देत राहील. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सारिका कुलकर्णी \u003cbr\u003eप्रकाशक. ग्रंथाली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52971902468418,"sku":"GRAN0062","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChittarBittarF.jpg?v=1777200600","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/chittar-bittar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}