{"product_id":"corporate-kabeer","title":"Corporate Kabeer (कॉर्पोरेट कबीर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकॉर्पोरेट कबीर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eएक महान द्रष्ट्याने दिलेले कॉर्पोरेट धडे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकड़ी है धारा राम की, काचा टिकै न कोय । सिर सौपै सीधा लड़ै, सूरा कहिये सोय ।। \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e(सदाचाराचा मार्ग कठीण असतो; हौशी, वरवर काम करणाऱ्यांसाठी नाही. जो प्रामाणिकपणे, सन्मार्गाने लढा देतो, त्यालाच खरा शूरवीर असं म्हणतात.) कबीरांचा हा दोहा सदाचाराचं महत्त्व सांगणारा आहे. कबीरांच्या अशा अनेक दोह्यांचं अर्थासह संकलन केलेलं आणि त्या दोह्यांची आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रासाठीची उपयुक्तता सांगणारं पुस्तक आहे 'कबीर इन कॉर्पोरेट्स.' जीवघेण्या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी माणसाला झगडावं लागतंय. त्यामुळे प्रत्येक माणूस मानसिक दडपणाखाली जगतो आहे. तेव्हा स्पर्धेत उतरून व्यावसायिक यश तर मिळवायचं आहे; पण त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं मानसिक स्वास्थ्यही जपायचं आहे, असा समतोल साधायचं काम हे दोहे करू शकतात. या दोह्यांतून व्यावहारिक चातुर्याचे, उत्तम व्यवस्थापनाचे धडे मिळतात. हे दोहे यश आणि आनंद यांच्यात समतोल साधायला शिकवतात, प्रशिक्षकाची निवड करायला आणि स्वतः योग्य प्रशिक्षक कसं व्हावं हेही सांगतात आणि अन्य मुद्द्यांबाबतही मार्गदर्शन करतात. कबीरांचं द्रष्टेपण आणि आजचं कॉर्पोरेट जगत याची ही अपूर्व, मार्गदर्शक सांगड खरंच अभिनव म्हणावी अशीच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : गुरुचरण सिंग गांधी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : सायली गोडसे  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943280038210,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/CorporateKabeerF.png?v=1782971085","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/corporate-kabeer","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}