{"product_id":"dakshin-kashi-prakasha","title":"Dakshin Kashi Prakasha (दक्षिण कशी प्रकाशा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदक्षिण कशी प्रकाशा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रकाशाला अत्यंत प्राचीन असा प्रागैतिहासिक, ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे. संपूर्ण खानदेशातील हे सर्वात प्राचीन व पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. गोमाई, तापी व लुप्त झालेली पुलिंदा (पयोष्णी) अशा त्रिवेणी संगमावरील हे तीर्थक्षेत्र असून स्कंद पुराणातल्या सहाव्या खंडात (तापी महात्म्य) प्रकाशाचा प्राचीन महिमा वर्णन करणारे अनेक अध्याय आले आहेत. एका तपानंतर (१२ वर्षांनी) येणाऱ्या सिंहस्थपर्वणीचा उत्सवही भारतात ज्या मोजक्या ठिकाणी साजरा होतो (हरिद्वार, प्रयाग, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, प्रकाशा) त्यात प्रकाशाचा समावेश आहे. महाराष्ट्रात केवळ त्र्यंबकेश्वर व प्रकाशा या दोनच ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. त्यामुळे प्रकाशाचे तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व व पावित्र्य वाढले आहे. नद्यांच्या काठावरील विहंगम दृश्यामुळे तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन स्थळ म्हणूनही प्रकाशा महत्त्वाचे ठिकाण आहे. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात प्रकाशा येत असल्याने तीन राज्यातून येथे तीर्थयात्री, भाविक, पर्यटक व अभ्यासक तसेच नर्मदा परिक्रमा करणारे तीर्थयात्री येत असतात. या सर्वांनाच ऐतिहासिक निकषांवर तपासलेली सत्यान्वेषी माहिती, धार्मिक माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, त्यांना येथील सर्व ठिकाणे अभ्यासपूर्वक पाहता यावी, प्रकाशाचे प्राचिनत्व, पौराणिकत्व त्यांना ज्ञात व्हावे, त्यांच्यातील भक्तीभाव वाढावा व त्यांची तीर्थयात्रा सर्वार्थान सुफळ संपूर्ण व्हावी हाच या पुस्तकामागील खरा हेतू आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री \u003cbr\u003eप्रकाशक. अपरांत प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52855847256386,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DakshinKashiPrakashaF.jpg?v=1775630755","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dakshin-kashi-prakasha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}