{"product_id":"danpatra","title":"Danpatra (दानपत्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदानपत्र\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदानपत्र ही कादंबरी म्हणून एका वाड्याच्या आणि जमिनीच्या वादाची कथा सांगते; पण तिच्या अंतःस्तरावर ती पिढ्यांच्या नात्यांची, स्मृतींच्या टिकाऊपणाची आणि मानवी मूल्यांच्या वारशाची कथा आहे. बदलत्या काळात माणूस काय गमावतो आणि काय जपून ठेवतो - हा प्रश्न या कथेत सतत उपस्थित राहतो. कादंबरीचा शेवट एखाद्या अंतिम निकालात बंद होत नाही; उलट तो वाचकाला विचारांच्या एका शांत पण खोल प्रदेशात नेऊन ठेवतो. जमीन कोणाची हा प्रश्न कदाचित सुटतो किंवा सुटत नाही; पण त्या प्रक्रियेत वारशाचा अर्थ मात्र बदलून जातो. आणि कदाचित हाच या कथेचा खरा केंद्रबिंदू आहे- माणूस मागे ठेवून जातो ती फक्त मालमत्ता नसते; तो मागे ठेवून जातो ते एक अदृश्य दानपत्र, जे पुढच्या पिढ्यांनी जपायची असतं. इतिहासाचा त्याग पुढच्या पिढी पर्यंत पोहोचतो का, की तो कागदांमध्ये हरवून जातो ? कादंबरीतील भाषा लातूर परिसरातील आहे. अत्यंत सुंदर अशा बोली भाषेतील वाक्ये वाचकाला मजा आणतात.\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. अभयकुमार कुलकर्णी \u003cbr\u003eप्रकाशक. राजेंद्र प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52972033933634,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DanpatraF.jpg?v=1777203228","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/danpatra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}