{"product_id":"dikpal-sankalpana-daivatkatha-va-dharmik-vidhi","title":"Dikpal Sankalpana : Daivatkatha Va Dharmik Vidhi  (दिक्पाल संकल्पना : दैवतकथा व धार्मिक विधी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदिक्पाल संकल्पना : दैवतकथा व धार्मिक विधी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया ग्रंथाची काही वैशिष्ट्ये आहेत. दिक्पाल संकल्पनेचा उद्गम आणि विकास यांचा आढावा घेताना लेखिकेने वेद, उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, स्मृतिवाड़मय, धर्मसूत्रे, पुराणे आणि आगमग्रंथ यांचा उपयोग केला आहे. या वाङ्मयातून दिशा आणि दिक्पाल यांचे धार्मिक विधीवत महत्त्व काय, उद्देश काय, उपयोग काय व तो कशासाठी करून घेतला गेला या संबंधीचे विवेचन आले आहे. तर त्यांचे प्रत्यक्ष शिल्पांकन मंदिरातून आणि क्वचित मूर्तीसमवेत कसे झाले आहे याचा विचार लेखिकेने केला आहे. तो प्रामुख्याने त्यांची माहिती असलेल्या विशेषतः इंग्रजीतील ग्रंथांच्या आधारे. दुसरे वैशिष्ट्य हे की धार्मिक विधीतील दिशा आणि दिशासमूह तसेच लोकपाल आणि दिक्पाल या संबंधीची माहिती जशी विस्ताराने येथे मिळते तशीच ती मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र यात त्यांचे प्रयोजन कसे आहे हेही कळते. हे दिक्पालांचे दोन्ही आयाम अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना येथे एकत्र पहायला मिळतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा अ. जामखेडकर \u003cbr\u003eप्रकाशक. अपरांत पब्लिकेशन \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52846882128194,"sku":"APR0038","price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DikpalSankalpanaF.jpg?v=1775388882","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/dikpal-sankalpana-daivatkatha-va-dharmik-vidhi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}