{"product_id":"divyapurti-by-dr-veena-tarkunde-prof-dr-subhash-bhave","title":"Divyapurti (दिव्यपूर्ती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदिव्यपूर्ती\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदिव्यत्त्वाची जेथे प्रचिती । तेथे कर माझे जुळती ॥ या पंक्तीप्रमाणे दिव्यत्त्वाची प्रचिती देणारी, उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली, ध्येयवेडी प्रेरणास्थाने 'दिव्यपूर्ती' या पुस्तकात जागोजागी आहेत. शारीरिक व्यंगावर मात करत, टक्केटोणपे खात अखेर विजयश्री कशी खेचून आणली याचे वर्णन प्रत्येक कथेत आढळते. दिव्यदृष्टी, निःशब्द, सिद्धहस्त, पदोन्नती आणि बहुआयामी अशा पंचवीस विविधरंगी असाधारण व्यक्तिरेखांचा जीवनप्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पाठीशी सतत भक्कमपणे उभे राहणाऱ्या इतर संबंधित व्यक्ती अथवा संस्था (स्टेकहोल्डर्स) यांची भूमिकाही फारच महत्त्वाची ! अशा प्रातिनिधिक स्वरूपाच्या समाजातील नऊ स्टेकहोल्डर्सच्या गाथाही या पुस्तकात समाविष्ट आहेत. यात सामाजिक जाणिवेचा अविष्कार प्रकर्षाने जाणवतो. सोलो पॅराग्लाइडर, सैनिक उद्योजक, वसुली निरीक्षक, तसेच IIM-A, SEBI, SBI, ALMICO, BMCC, दिव्यांग भवन फाउंडेशन, अमेरिकेतील ETS इ. ठिकाणी महत्त्वाच्या भूमिका चोख बजावणाऱ्या; IDEA, NAWPC, रोहिणी, कखग क्रिएटिव स्टूडियो, स्वामी समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था, स्वयंदीप या संस्था स्थापन करणाऱ्या; कथाकार, निवेदिका, कुस्तीपटू, सुबक एम्ब्रॉयडरी, शिवणकाम करण्यापासून पट्टीच्या पोहणाऱ्यापर्यंत आपल्या कर्तृत्वाची कमान सतत उंचावत ठेवणाऱ्या या सर्वच असामान्य शक्ती !\u003cbr\u003eउत्तुंग भरारी घेणाऱ्या दिव्यांगांच्या भावस्पर्शी तसेच प्रेरणादायी कथा आणि संस्थांच्या माहितीमुळे 'दिव्यपूर्ती' हे पुस्तक सर्वच वाचकांना निश्चितच आवडेल आणि त्यांना प्रेरित करेल ! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. वीणा नितिन तारकुंडे \/ प्रा. डॉ. सुभाष वामन भावे \u003cbr\u003eप्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स  \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52092945826114,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DivypurtiF.jpg?v=1772003037","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/divyapurti-by-dr-veena-tarkunde-prof-dr-subhash-bhave","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}