Skip to product information
1 of 1

Akshardhara Book Gallery

Ek Hota Willi (एक होता विली)

Ek Hota Willi (एक होता विली)

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Anand Thakur

Publisher: Anubandh Prakashan

Pages: 400

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

 Ek Hota Willi (एक होता विली)

पॅरिसमध्ये जन्म घेऊन बालपणाची बारा वर्षे तिथेच ऐषोरामात काढल्यानंतर अचानक आई- वडिलांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेला विली इंग्लंडमध्ये त्याच्या धर्मोपदेशक असलेल्या अपत्यहीन काकाकडे जबरदस्तीने आश्रयाला जातो व त्याचे सारे विश्वच उलटेपालटे होते. आता दारिद्र्याशी त्याचा नव्याने परिचय होतो व त्याला स्नेहहीन वातावरणात वेगळ्या संस्कृतीत आपले तारुण्य काढावे लागते. त्यातच तो तोतरा असतो, त्यामुळे त्याला शाळेत घातल्यानंतर शाळासोबत्यांकडून व काही शिक्षकांकडूनही त्याची क्रूर ससेहोलपट केली जाते. कसाबसा तो डॉक्टर बनतो, पण एक दिवसही प्रॅक्टिस करीत नाही, कारण की त्याला लेखक व्हायचे असते. तेही व्यावसायिक. मग जीवनाशी त्याचा जीवघेणा संघर्ष चालू होतो, पण अखेर महत्प्रयत्नांनी तो साऱ्या अडचणींवर मात करतो व एकविसाव्या शतकातला सर्वाधिक लोकप्रिय इंग्लिश लेखक बनतो. कादंबरीकार, कथाकार, नाटककार, विनोदकार, पटकथाकार, जगप्रवासी, गुप्तहेर, टीकाकार वगैरे बनून जीवनाच्या अनेकविध क्षेत्रांत तो आपली चमक दाखवितो व कीर्तीपाठोपाठ ऐश्वर्यसंपन्नही होतो. सॉमरसेट मॉम (१८७४-१९६५) या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय इंग्लिश लेखक म्हणावा लागेल. या लोकविलक्षण साहित्यिकाची ही मराठी वाचकांना करून दिलेली ओळख.

Publisher ‏ : ‎ Anubandha Prakashan

Author : Anand Thakur

View full details