{"product_id":"ekadash-katha","title":"EKADASH KATHA  (एकादश कथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eEKADASH KATHA  (एकादश कथा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकथा म्हणजे 'ASTHETIC SENSE IN A CAPSULE FORM !' अशी एक कथेची व्याख्या आहे. 'एकादश कथा' हा माझा तिसरा कथासंग्रह. (या पूर्वी माझ्या दोन कादंबऱ्या आणि पाच अनुवादही प्रकाशित झाले आहेत.) 'रिलेशन' हा स्त्री- पुरुष संबंधांतील वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या भावनाप्रधान कथांचा संग्रह आणि 'कोण तू' हा गूढ कथांचा संग्रह या दोन्ही कथासंग्रहाचे वाचकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे तसेच स्वागत या 'एकादश कथासंग्रहा'चे देखील होईल यात शंका नाही. या संग्रहात 'छत्री', 'गड्या! आपुला गाव बरा!' या विनोदी कथा, काहीशी गूढतेकडे वळणारी 'पूल' ही कथा, एका तरल आणि एक विफल प्रेमाची, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली 'समर्पण' ही करूण कथा आणि समाजात प्रत्यही घडणाऱ्या काही घटनांवर भाष्य करणाऱ्या 'देवाची काठी' आणि 'जुईची कळी फुलताना' अशा विविध धाटणीच्या एकूण अकरा कथा आहेत, म्हणून 'एकादश कथा!' वाचकांना या कथा निश्चितच आवडतील. विविध दिवाळी अंकांतून मागील दोन तीन वर्षांत प्रसिद्ध झालेल्या या कथा आहेत. दिवाळी अंक म्हणजे लेखकांना लिहिते ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणारी व्यवस्था आहे असे मला वाटते. ज्यांनी दिवाळी अंकांतून या कथा वाचल्या असतील त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल आणि जे प्रथमच वाचतील त्यांनाही आनंदच वाटेल..\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुरेश देशपांडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67977823420738,"sku":"MIHA0228","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ekadashkatha-f.jpg?v=1793440751","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ekadash-katha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}