Akshardhara Book Gallery
Film Makers (फिल्म मेकर्स)
Film Makers (फिल्म मेकर्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ganesh Matkri
Publisher: Majestic Publishing House
Pages: 186
Edition: latest
Binding: hardbound
Language:Marathi
Translator:----
फिल्म मेकर्स
गणेश मतकरीची समीक्षणाची पद्धत अभ्यासपूर्ण आहे. त्याचबरोबर चित्रपटतंत्रातल्या शब्दांचा अतिवापर करून येणारा क्लिष्टपणाही त्याच्या शैलीत नाही. त्याची भूमिका ही वाचकांच्या, एका रसिक चित्रपटप्रेमी मित्राची आहे. हा मित्र वाचकांपर्यंत न पोचलेले चित्रपट पहातो, प्रत्यक्ष चित्रपटांमधून आणि इतर वाचनातून त्या दिग्दर्शकांचा अभ्यास करतो आणि वाचकाला त्या चित्रपटाविषयी आणि दिग्दर्शकाविषयी कुतूहल निर्माण व्हावे- बघण्याची दृष्टीही उमजावी अशी त्या अभ्यासाची मांडणी करतो. त्यामुळे सरावाच्या चित्रपटांबाहेर न पहाणार्या वाचकाला नव्या नजरेने या माध्यमाकडे पहायला लावणारं हे लिखाण आहे. म्हणून मला ते महत्त्वाचे वाटते. त्याच्या पहिल्याच पुस्तकात त्यानं हे साध्य केलं आहे. याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन.
-सुमित्रा भावे
लेखक : गणेश मतकरी
प्रकाशन : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
