{"product_id":"ganak-yantra-manav","title":"Ganak - Yantra - Manav (गणक - यंत्र - मानव)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगणक - यंत्र - मानव\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eइ.स. १९२७ साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी सादर केलेल्या 'परिस्पर्शकाची उपपत्ती' (Theory of envelopes) या ९३ पानी निबंधाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या नावाची शिफारस होऊन त्यांना 'इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी' चे मानद सभासदत्व दिले. या सोसायटीच्या १९३८ पासून ते १९८५ पर्यंतच्या सर्व म्हणजे ४८ अधिवेशनांना ते नियमितपणे उपस्थित राहिले आणि आपले शोधनिबंध सादर केले. यामुळे देशातील अन्य प्रांतातीलच नव्हे तर विदेशी गणित तज्ज्ञ, अभ्यासक त्यांना ओळखत होते. रेल्वे डब्यावरील नंबर किंवा कुठलीही मोठी संख्या बघून त्यातून काही सूत्र ते शोधून काढत असत. आजच्या आपल्या मोबाईल नंबर्सची १० अंकी संख्या हे त्यांच्याच कार्याचे फलित असून 'नोकिया' या कंपनीने त्यांच्या कार्यालयात याविषयीची कृतज्ञतापूर्वक नोंद केली आहे. यदाकदाचित कापरेकरांना जन्म पाश्चात्य देशात झाला असता तर त्यांचा अनेक अंगांनी बहुमान झाला असताच, शिवाय त्यांच्या नावे विद्यापीठात अध्यासने निर्माण झाली असती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. दिलीप गोटखिंडीकर \u003cbr\u003eप्रकाशक. परम मित्र  पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53000656617794,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GanakYantraManavF.jpg?v=1777784043","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ganak-yantra-manav","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}