Skip to product information
1 of 4

Akshardhara Book Gallery

Gaitonde (गायतोंडे)

Gaitonde (गायतोंडे)

Regular price Rs.3,000.00
Regular price Sale price Rs.3,000.00
Liquid error (snippets/price line 128): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: CHINHA PUBLICATION

Pages: 216, 25

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

गायतोंडे

शरीर अक्षरशः विदीर्ण करून टाकणारा एक महाभयंकर अपघात सोडला, तर तुमच्या-आमच्या कुणाच्याही आयुष्यात घडत असतात, तशाच चित्रविचित्र घटना चित्रकार गायतोंडे यांच्या आयुष्यातदेखील घडल्या, पण गायतोंडे ध्येयापासून विचलित झाले नाहीत. प्रचंड वाचन, अखंड मनन, सतत चिंतन, ध्येयाप्रती अढळ निष्ठा आणि कुणाच्याही दबावाखाली न येता आपल्याला हवे तेच प्रत्यक्षात आणण्याची अफाट जिजीविषा यांद्वारे ते मार्गक्रमणा करीतच राहिले. अपघातामुळे कॅनव्हाससमोर उभं देखील राहता येईना, पण त्याचा बाऊ न करता कोऱ्या कॅनव्हाससमोरच्या आरामखुर्चीवर ते चिंतन-मनन करीत, थोडेथोडके नाही, तर तब्बल आठ वर्षं वाट पाहत बसून राहिले. अखेर तो क्षण आलाच. गायतोंडे पुन्हा नव्या जोमानं पेंटिंग करू लागले. २००१ साली, वयाच्या १७७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

गायतोंडे यांची ही भन्नाट कहाणी इथं संपली का? तर नाही, उलट तिथंच त्या कहाणीनं एक नवं वळण घेतलं. ते गेले आणि काही दिवसांतच त्यांची पेंटिंग कोट्यवधी रुपयांना विकली जाऊ लागली. न्यूयॉर्कच्या ग्युगेनहाई म्युझियमतर्फे सिंहावलोकन प्रदर्शन भरवलं जाणार असल्याची बातमी आली आणि त्यांची दोन पेंटिंग लंडनमध्ये एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या लिलावांत १२ कोटींना विकली गेली. तर आणखी एका लिलावात एकच पेंटिग २३ कोटी ७० लाखांना विकलं गेलं.

संपादक: सतीश नाईक 

View full details