Akshardhara Book Gallery
Gosht Chhoti Shikavan Mothi (गोष्ट छोटी शिकवण मोठी)
Gosht Chhoti Shikavan Mothi (गोष्ट छोटी शिकवण मोठी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Guru Thakur
Publisher: Ladoba Prakashan
Pages: 24
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गोष्ट छोटी शिकवण मोठी
प्रिय बालमित्रांनो,
आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की यश म्हणजे फक्त परीक्षेतले चांगले गुण, गडगंज पैसा किंवा मोठमोठी पदकं ! पण मी माझ्या अनुभवातून शिकलोय की खरं यश यापेक्षा वेगळं आणि सहज आहे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारणे, भविष्याचे अतिरंजन आणि त्याच्या चिंतेपेक्षा वर्तमानातील क्षणात जगता येणं आणि दैनंदिन जीवनात जे योग्य आहे तेच करणं हे माझ्या दृष्टीनं खरं यश. कौतुक सोहळे, बक्षिसे आपल्याला तात्पुरता आनंद देतात पण एक चांगली व्यक्ती म्हणून जगल्यामुळे तुमच्या मनाला मिळणारी शांतता, समाधान मात्र आयुष्यभर तुमच्यासोबत राहते.
माझं शब्दांवर खूप प्रेम आहे आणि मला चित्रं काढायलाही मनापासून आवडतं. म्हणूनच या दोन्ही माध्यमांद्वारे आयुष्यानं मला सांगितलेल्या सुंदर गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. त्यासाठी हे चित्रकथांचं पुस्तक. मला आशा आहे की हे पुस्तक तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टीतून ज्ञान, आनंद आणि प्रेरणा घ्यायला शिकवेल.
या गोष्टी वाचताना प्रत्येक गोष्टीमागच्या विचारांचा शांतपणे विचार करा. मनात प्रश्न निर्माण होऊ द्या आणि हवे तर तुमचे स्वतःचे विचार, प्रश्न एका डायरीत लिहून ठेवा. वाचनामुळं आपल्याला हे जग समजून घ्यायला मदत होते आणि लेखनामुळं आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. या पुस्तकातील छोट्या छोट्या गोष्टींशी तुमची घट्ट मैत्री होईल, त्या तुम्हाला चांगल्या गोष्टींची निवड करायला, मोठी स्वप्नं पाहायला आणि कोणत्याही आव्हानाला धैर्यानं सामोरं जायला मदत करतील याची मला खातरी आहे. या रंजक प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या आणि यातील बोध तुम्ही मनाच्या कप्प्यात जपून ठेवा. आयुष्यात जिथं जाल तिथं तो सदैव सोबत राहील!
लेखक : गुरु ठाकूर
