{"product_id":"gosht-tiranga-dhwajachi","title":"Gosht Tiranga Dhwajachi (गोष्ट तिरंगा ध्वजाची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगोष्ट तिरंगा ध्वजाची\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपला राष्ट्रध्वज आपल्याला माहीत असतो. तसंच आपलं राष्ट्रगीतसुद्धा आपल्याला माहीत असतं, पाठही असतं. राष्ट्रगीताच्या बाबतीत आपल्याला ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे, हेदेखील माहीत असतं. पण राष्ट्रध्वजाचं डिझाइन कोणी बनवलं? कधी बनवलं? त्यामागची प्रेरणा काय होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला माहीत नसतात. आपल्या देशाचा तिरंगा झेंडा काही एका रात्रीत तयार झाला नाही. तीन रंगांच्या तीन आडव्या पट्ट्या आणि मध्ये निळ्या रंगातलं अशोक चक्र, हे अंतिम रूप मिळण्याअगोदर तो अनेक रूपांमध्ये अवतरला होता. झेंड्यामधल्या परिवर्तनाशी कितीतरी लोक जोडले गेले होते, ज्यांची माहिती आपल्याला नसते. प्राचीन काळापासून सर्व जगाला भारत देश माहीत होता, भारताची कीर्ती सर्वत्र पसरली होती. पण विविध भाषा, पंथ, संप्रदाय यांनी नटलेला हा संपूर्ण देश 'आपला' आहे ही भावना कुठून आली? देश स्वतंत्र होऊन त्यावर इथल्या जनतेचंच राज्य असावं, यासाठी संघटित लढा देण्याइतकी बांधिलकी कशी निर्माण झाली, कोणी निर्माण केली ? वेगळ्या शब्दांत म्हणायचं तर भारत देशाच्या भौगोलिक सीमा माहीत असल्या, तरी या देशाचं 'राष्ट्र' कसं झालं, याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. या पुस्तकात या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अगदी स्थळकाळाचे, व्यक्ती आणि घटना यांचे ऐतिहासिक संदर्भ देत दिली आहेत. त्यामधून आपल्याला या राष्ट्राच्या घडणीत कोणाकोणाचं योगदान आहे हे जसं कळतं, तसंच कोणाचं अजिबात नाही, हेदेखील स्पष्ट होतं. देशाची खरी ओळख काय आहे, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. निशा शिवूरकर यांची शैली रसाळ आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती रंजकपणे समोर येते. हे पुस्तक वाचनीय तर आहेच; परंतु त्यातील विधानांना भक्कम पुराव्यांचं पाठबळ असल्याने ते स्वतःच एक ऐतिहासिक दस्तावेज झालं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. निशा शिवूरकर \u003cbr\u003eप्रकाशक. अक्षर प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52832718979394,"sku":"AKSH0020","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GoshtTirangaDwajachiF.jpg?v=1775128355","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/gosht-tiranga-dhwajachi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}