Akshardhara Book Gallery
Heal Your Gut Mind & Emotions (हील युवर गट माइंड अँड इमोशन्स)
Heal Your Gut Mind & Emotions (हील युवर गट माइंड अँड इमोशन्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dimple Jangda
Publisher: Madhushree Publication
Pages: 235
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vikas Balwant Shukl
हील युवर गट माइंड अँड इमोशन्स
तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा संबंध तुमच्या पचनसंस्थेशी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तुमची पचनसंस्था जितकी निरोगी, तितके तुम्ही अधिक सुदृढ !
पचनसंस्थेला ऊर्जेचा केंद्रबिंदू मानून, आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांनी प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र, आधुनिक संशोधन आणि पोषणशास्त्र यांचा प्रभावी संगम साधत जगभरातील असंख्य लोकांना जुनाट आजारांवर मात करण्यास मदत केली आहे. विशेषतः अन्नरसायनशास्त्रावर भर देत, त्यांनी आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोग उलटवण्यासाठी आहार कसा उपयोगी ठरू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले आहे. या सर्वसमावेशक पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्याला आकार देणारी तत्त्वे आणि साधने सामाईक केली आहेत. तसेच, आहाराचा योग्य उपयोग करून आरोग्य टिकवण्याचा आणि आजारांना प्रतिबंध घालण्याचा मार्ग दाखवला आहे. त्यांनी पचनसंस्थेची प्रचंड क्षमता उघड करण्यासाठी आणि पचन व मेंदू यांच्यातील परस्परसंवाद सुधारण्यासाठी एक पाच पायऱ्यांची प्रक्रिया मांडली आहे. यामुळे शरीराला खरोखरच काय आवश्यक आहे, याची जाणीव होईल. डिंपल यांचा उद्देश लोकांना योग्य पोषणाच्या मदतीने आजार टाळण्यास सक्षम करणे हा आहे. या सर्वसमावेशक आणि सुलभ पुस्तकाद्वारे, त्यांनी हे कसे शक्य आहे, हे स्पष्टपणे दाखवले आहे.
प्रकाशक. मधुश्री पब्लिकेशन
मूळ लेखक. डिंपल जांगडा
अनुवादित लेखक. विकास बळवंत शुक्ल
