{"product_id":"hedam","title":"Hedam (हेडाम)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eहेडाम \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'बनगरवाडी' या अजरामर कादंबरीच्या अलौकिक रस्त्यावरचा पुढचा पल्ला म्हणजे 'हेडाम' आहे. १९५५ मध्ये व्यंकटेश माडगुळकर यांनी माणदेशी मेंढपाळाचं जगणं 'बनगरवाडी' कादंबरीच्या रूपानं पहिल्यांदा साहित्यात आणलं. त्याच माणदेशातील एके धनगराच लेकरू मेंढ्याच्या कळपात वाढलेला, नागु जेव्हा आपल्या व आपल्या समाजाच्या भोगाचे चटके स्वतः त्याच्या बोलीभाषेत शब्दबद्ध करतो तेव्हा सहाजिकच त्याच्या शब्दांना मेंढीच्या कच्च्या दुधाचा सुगंध आहे. शेरडाकरडाच्या लेंड्यामुताचा गंध आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपली जित्राबं घेऊन चारा मिळेल तिकडे रोज नवं गाव नवी चूल करत फिरणाऱ्या वारा, पावसात उघड्या माळावर राहूटी करणाऱ्या 'रानशाळेत' लेखकाचं जीवन गेलं आहे. त्यामुळे तो मोठ्या आगत्याने त्या चित्रमय रित्या वाहत्या जीवनाला तुंबा घालून साहित्याचे कुंड किंवा रांजन भरतो. गुरुजनांची कृपादृष्टी शिष्यावर झाल्यावर काय घडतं ते वाचनीय आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकोकरं, बालींगं, खडपा, कोयाळ, मारकुंडा, कोडगा, फासमी कुत्रं, हुर्द, छकाटा, खवीस, किंकाळी, पासारी, मोहरक्या, अवकाळ गाबनं पाऊस, कोचाळ, खेकटं, फाजर, हेलगडी, डोकं भंजाळनं, वांबाळ, बावळाट, खैताळ अशा प्रकारे मराठी अभिजात भाषेच्या कुशीत सुरती रूपयाच्या मोहरा पेरत जाव्यात तसा हा गडी शब्दांची पखरण करत राहतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e 'हेडाम' ही कांदबरी समाजशास्त्र मानववंशशास्त्राच्या अशा अनेक ज्ञानशाखांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा 'दस्ताऐवज' आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअसे गोड वाड्यीन अपघात क्वचितच कधीतरी घडतात. या कादंबरीच्या निमित्ताने माय मराठीच्या ओटीत नागु विरकर यांनी अपरिचित समर्पक व माळामुरडाच्या शब्दफुलांचा झेला मुठीमुठीने ओतला आहे. त्या दृष्टीने 'उपरा' नंतर अशी अजब करामत क्वचितच कोणाकडून घडली असेल तर ती हेडाममधूनच. वाचकांना एक अप्रतिम ग्रामीण कलाकृती वाचल्याचा नक्की आनंद होईल. प्रत्येकांनी ती वाचली पाहिजे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनागु विरकर यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा आणि भंडारा उधळून अभिनंदन ! \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविश्वास पाटील\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e अध्यक्ष\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नागु विरकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : पेन पब्लिशिंग हाऊस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54967815635266,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HedamF.png?v=1783576114","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/hedam","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}