{"product_id":"hi-vishwavyapi-valaye-dukhkhachi","title":"Hi Vishwavyapi Valaye Dukhkhachi (ही विश्वव्यापी वलये दुःखाची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eHi Vishwavyapi Valaye Dukhkhachi (ही विश्वव्यापी वलये दुःखाची)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e। लिहिण्यानं वा बोलण्यानं कवीचं अस्वस्थ मन पद्मपाणि होत असावं ।\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकुणीच सांगू शकत नाही की लिहिण्यानं वा बोलत राहण्यानं काही पडतो का फरक अंगावर संततधार कोसळणाऱ्या दुःखात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतरीही कवी लिहितोय वा बोलत राहतोय; अशासाठी की लिहिण्यानं वा बोलण्यानं मिळत असावी मुक्ती कैदेत खितपत पडलेल्या हजारो नि:शब्द उच्चारांना.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकवीच्या लिहिण्यानं झाडांना निवांत झोप येते. आटलेल्या नदीतून खळखळ पाणी वाहू लागतं. ढग दाटून येतात पावसाची वाट पाहणाऱ्या दयाळू शेतकऱ्यांच्या कनवाळू डोळ्यांमध्ये.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलिहिण्यानं वा बोलण्यानं डळमळू लागतात मग्रूर सत्ताधीशांची रक्तरंजित पावलं किंवा थरथर कापतात जुलमींचे हिंस्र हात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलिहिण्यानं वा बोलण्यानं कवीचं अस्वस्थ मन पद्मपाणि होत असावं. कवितेतील ओळींच्या रिकाम्या पोकळीतून उडत राहणारी कितीतरी मोहक फुलपाखरं वाचणाऱ्यांच्या मनात फुलवत असावीत फुलं. कवी यासाठी लिहीत असावा की स्वप्नातील स्वप्निल गुलमोहर स्वप्नातून बाहेर फुलून येऊन रंगांची उधळण करीत राहावा सगळ्या चराचरावर फुलांची.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमीही लिहीत राहतो वा बोलत राहतोय यासाठी की माझ्यातूनही फुलं उमलून सडा पडावा सर्वत्र.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: दिनकर मनवर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: शब्द पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56031116656962,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/hivishvavyapi-f.jpg?v=1788161296","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/hi-vishwavyapi-valaye-dukhkhachi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}