{"product_id":"ishwar-mala-gungunato-deep-ragasarkha","title":"Ishwar Mala Gungunato Deep Ragasarkha (ईश्वर मला गुणगुणतो दीप रागासारखा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eईश्वर मला गुणगुणतो दीप रागासारखा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुमारे आठ वर्षांपूर्वी मला इंटरनेटवर बाबुषा कोहली ह्या हिंदी कवयित्रीचा शोध लागला. अमृता प्रीतमची मौलिकता, काव्यलेखनाविषयीचं गांभीर्य, जगभरातील साहित्य-कलाव्यवहाराबद्दलची जाण आणि कोणत्याही कळपापासून दूर राहून आपली स्वतंत्र वाट चोखळण्याचं धाडस, एवढे सारे गुण इतक्या लहान वयात तिच्या अंगात आहेत, ह्याचं मला वाटलेलं नवल अजूनही सरलं नाही. जी कविता आपल्याला आवडते, आपल्या भावविश्वाचा एक भाग आहे असे वाटते, तिच्याशी नातं जोडण्याचा एक मार्ग म्हणजे तिचा अनुवाद करणं असं मी नेहमीच मानलं आहे. त्याप्रमाणे गेली आठ वर्षे मी तिच्या कवितांचा अनुवाद करतो आहे. तिच्या कविता आपल्याला प्रचंड थकवतात. एक कविता पूर्ण वाचायची तरी दहादा थबकावं लागत. तिच्यात इतके सारे संदर्भ, इतकी सूक्ष्मता, इतके पदर असतात की कविता पुन्हा पुन्हा वाचावी लागते. दरम्यान तिची कविता आपल्या खूप पुढे निघून जाते. तिची त्यानंतर दोन की तीन पुस्तकं आली. त्यांना हात घालायचा धीर मला अजून झाला नाही. तिच्या आसपास जाऊ शकेल असा एकही लिहिता कवी मला मराठीत दिसत नाही. (हे माझे मत झाले.) तिच्या युवा ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या काव्यसंग्रहाचा हा अनुवाद आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. बाबुशा कोहली \u003cbr\u003eअनुवादित लेखक. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914437292354,"sku":null,"price":273.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/IshwarMalaGunguntoDeepRagasarkhaF.jpg?v=1775905871","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ishwar-mala-gungunato-deep-ragasarkha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}