Akshardhara Book Gallery
ISRO The Pride of India (इस्रो द प्राईड ऑफ इंडिया)
ISRO The Pride of India (इस्रो द प्राईड ऑफ इंडिया)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 204
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
इस्रो द प्राईड ऑफ इंडिया
भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्यातील एक मानाचं पान इस्रोला नक्कीच असेल. या संस्थेची जडणघडण कशी झाली? तिचे शिल्पकार कोण आहेत? तिच्या आजवरच्या प्रवासात काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली? इस्रोसोबतच्या सहयोगी संस्था नक्की काय योगदान देतात? या क्षेत्रात संशोधनाच्या काय संधी उपलब्ध आहेत? हे सर्व जाणून घ्या! आज, एकविसाव्या शतकात भारत तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महाशक्ती बनत आहे. एकेकाळी सायकल आणि बैलगाडीवर रॉकेट नेताना जे जग भारतावर हसलं असेल, तेच जग आज इस्रोची प्रगती पाहून चकित होत आहे. स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्यांच्यापैकी कोणताही देश आज तंत्रज्ञानामध्ये भारताएवढा अग्रेसर झाला नाही. तंत्रज्ञानाबाबत आजही ते अमेरिका, रशिया किंवा युरोपीय देशांवर अवलंबून आहेत. भारत मात्र तंत्रज्ञानाच्या दृष्टीने स्वयंपूर्णतेकडे पावलं टाकत असताना इतर देशांचीदेखील गरज भागवत आहे. आज विकसित देशदेखील आपले उपग्रह पाठवण्यासाठी इस्रोची निवड करत आहेत. रॉकेट सायन्स किंवा इतर कोणतंही शास्त्र हे कधीच क्लिष्ट नसतं. एकदा हे विषय समजायला लागले, की त्यांची गोडी वाटू लागते. ही गोडी अधिकाधिक वाढावी या अपेक्षेसह हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत.
या पुस्तकाचे लेखक : डॉ. नितीन हांडे , प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस