{"product_id":"jagan-lihina-shwas-ghena","title":"Jaganm Lihinam Shwas Ghenam (जगणं लिहिणं श्वास घेणं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eजगणं लिहिणं श्वास घेणं \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडोरिस ड्योरीच्या मते अधिक उत्कटपणे जगण्याचा मार्ग म्हणजे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलिहिणं. आणि लेखन म्हणजे स्तब्ध, शांत होणं, जाणीवपूर्वक आठवणी जागवणं आणि जग आणखी चांगल्या पद्धतीने जाणून घेणं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाच्या माध्यमातून ही मोठी लेखिका दैनंदिन लेखनातून मिळणारा आनंद तिच्यासोबत वाटून घ्यायला आपल्याला आमंत्रित करते. 'लाज, भीती, स्वतःबद्दलचा संदेह आणि शुद्धलेखनाचे नियम बासनात गुंडाळून ठेवायचे आणि पुढचा मागचा विचार न करता स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहायला सुरुवात करायची. '\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडोरिस ड्योरी आपली लेखनवाटाड्या बनते आणि उत्कटपणे, नर्मविनोदी शैलीत व अतिशय प्रांजळपणे विविध विषयांना हात घालते. बालपणीच्या आठवणी, अपरिचित ठिकाणं, हरवलेल्या वस्तू व गमावलेली माणसं; मैत्री आणि पछाडून टाकणाऱ्या गोष्टी. त्यामुळेच हे पुस्तक एका कुतूहलाने भरलेल्या, निर्भय आणि प्रेरणादायी स्त्रीचं व्यक्तिचित्र बनलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eती आपल्याला श्वास घेत राहायला, लिहित राहायला आणि काहीही झालं तरी आयुष्याला सामोरं जात राहायला बळ देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003eलेखक : डोरिस ड्योरी\u003cbr\u003eअनुवाद : साकेत देखणे\u003cbr\u003eप्रकाशक : वॉल्डन पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54551621665090,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JAGANLIHINAF.jpg?v=1781592589","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jagan-lihina-shwas-ghena","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}