{"product_id":"janjal","title":"Janjal  (जंजाळ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eजंजाळ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिवेदनाच्या अनेक शैली असतात. रोजनिशी हा तसा वाचकाच्या दृष्टीने एक आकर्षक बंध ! कारण त्यात डायरी लिहिणाऱ्याच्या अत्यंत खाजगी जीवनात डोकावता येईल असं आकर्षण असतं. भागवतांना हा आकृतिबंध खूप वर्षं खुणावत होता. अगदी श्री. ना. पेंडसे ह्यांची 'लव्हाळी' वाचल्यापासून. फक्त केवळ आकृतिबंध आकर्षक असून काहीच भागत नाही. आशय हा त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा. 'सुलू' जेव्हा खुणावू लागली, तेव्हा काहीतरी जवळपास घुटमळतंय ह्याची त्यांना जाणीव होऊ लागली आणि दीड वर्षापूर्वी त्यांनी काही पाने लिहिली. पुन्हा त्यात काही अंतर गेले. आपण जगतो तशा व्यक्तिरेखा सुद्धा जगत राहतात आणि एक आकार धारण करतात. त्यांना तो वेळ देणे खूप आवश्यक असते. सुलू आकाराला आली... तिच्या साथीने मालती, राणू, संध्या, सगुणा, छाया, माया आणि हो... पांडू आकाराला आले, 'जंजाळ' आकाराला आले! हा प्रवास सुलूचा.. एका दिशाहीन जगण्यापासून ते एका उद्देशपूर्ण जगण्यापर्यंतचा. त्या प्रवासात तिच्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणींच्या जगण्याचा किंवा न जगण्याचा सुद्धा लेखाजोखा तिच्या डायरीच्या माध्यमातून... वाचकांना हे 'जंजाळ' नक्की खुणावेल ह्याची खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विक्रम भागवत \u003cbr\u003eप्रकाशक. मिहाना पब्लिकेशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52828383641922,"sku":"MIHA0062","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JanjalF.jpg?v=1775021348","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/janjal","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}