{"product_id":"jindadil","title":"Jindadil (जिन्दादिल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eजिन्दादिल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअॅडव्होकेट भाऊसाहेब पाटणकर महाराष्ट्रातील एक सुप्रसिध्द व्यक्तिमत्व दिल्ली ते हैद्राबादपर्यंत 'मराठी शेरोशायरी' च्या शेकडो मैफिली आत्मविश्वासानं जिंकणारा एकमेव कलंदर. शिकार, संगीत, अध्यात्म अशा वेगवेगळया क्षेत्रात समरसून जाणारा, उर्दू काव्याचा कैफ मराठी भाषेत निर्माण करणारा एक विलक्षण जिंदादिल. श्रृंगार ते अध्यात्मापर्यंत जीवनाच्या विविध टप्प्यांची वाटचाल रसिकतेनं आणि डोळसपणे करणारा एक वाटसरू. त्यांच्या कवितेत उर्दू कवितेची धुंद आहे पण तिची 'लगन' मात्र अस्सल 'महऱ्हाटी' शी आहे. त्यांची चिंतनशीलता प्रत्येक शेरातून जाणवते, नव्हे प्रत्येक रसिक हृदयाचा ठाव घेते. 'मराठी शायरी', 'मराठी मुशायरा', 'मैफिल' आणि मदोस्त होफ या पूर्वीच्या कलाकृतींना भाग्यवंत रसिकांनी अमाप दाद दिली. आता 'जिंदादिल' ही रसिकांची अशीच वाहवा घेईल\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. भाऊसाहेब पाटणकर \u003cbr\u003eप्रकाशक. उत्कर्ष प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52137120596290,"sku":"9560","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JindadilF.jpg?v=1772875536","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jindadil","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}