{"product_id":"jungle","title":"Jungle  (जंगल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJungle  (जंगल)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणूस-माणसांचे जगणे हे सुसंस्कृत-संभावित सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून सतत उन्नत व्हावे, पशुपातळीवरचे आदिमपण संस्कारांनी-नैतिक बंधनांनी उजळून जायला हवे. आपण सृजनशील कामप्रेरणा जीवनप्रेरणांमध्ये रूपांतरित करताना कुटुंब, लग्न, समाज, धर्म-संस्कृती अशा व्यवस्था निर्माण करीत आलो आहोत. प्रेम, नाती, पातिव्रत्य, नैतिक आचरण, संबंधांतील निष्ठा, व्यापार-व्यवहार संस्था आदिंच्या निर्मितीत सांस्कृतिकरण अपेक्षिले जाते. मात्र त्यातही काम-अर्थ या पुरुषार्थ साधनेचा जाच वाढावा आणि पुन्हा रानटी व्यवस्थेचेच पुनरुत्थान घडवावे का? दांभिकपणा हेच जीवनसत्त्व व्हावे का? आपण निखळ मानुषता आविष्कृत करू शकू का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e...अशा प्रश्नमालिकांचा जन्म 'जंगल'मधून होतो. पंकज कुरुलकर यांच्या एकूणच साहित्यनिर्मितीत, आशयसूत्रांच्या निवडीत, सादरीकरण पद्धतीत, सूक्ष्म संघर्षशीलता दिसते. त्यांच्या साहित्याच्या जीवनाशयात व जीवनदृष्टीत असांकेतिक अनोखेपण आहे. परंपरागत रुढावलेल्या, पुढारलेल्या आणि निर्ढावलेल्या स्त्री-पुरुष संबंध, नर- मादी संबंध, व्यक्ती-व्यक्ती संबंध, कौटुंबिक संबंध अशा मूल्यसंबंधांच्या जाळ्यांना परंपरा विचलनाच्या कृती छेदतात. प्रतिकारी नैतिकतेचा आघाती आत्मसूर येथील पात्रांच्या आत्मकथनांना- आत्मशोधांनाही प्राप्त होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: पंकज कुरुलकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67796484587842,"sku":"SHAB0012","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/jangal-f.jpg?v=1792317902","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/jungle","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}