{"product_id":"junnar-taluka-paryatan-margdarshika","title":"Junnar Taluka Paryatan Margdarshika (जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शिका)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eजुन्नर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतालुका पर्यटन मार्गदर्शिका\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपर्यटन म्हणजे नुसते फिरणे नव्हे. किल्ले, लेणी पाहायच्या तर आमच्या तालुक्यात म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका. याच तालुक्यातील शिवनेरी किल्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. निसर्गाने नटलेली व सुजलाम सुफलाम असलेली ही भूमी. आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण सुध्दा याच तालुक्यातील, पाच धरणे, अनेक मंदिरे आणि निसर्गाचे वरदान लाभलेला हा जुन्नर तालुका. जुन्नर तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि ती नेहमी पर्यटकांना आकर्षित करीत असून हजारो पर्यटक या स्थळांना भेटी देतात. किल्ले शिवनेरी, नारायणगड, चावंड, हडसर, जीवधन, धार्मिक- स्थळे ओझर, लेण्याद्री, वडज, कुकडेश्वर, घाटमार्ग पर्यटनात- माळशेज, नाणेघाट, दाऱ्याघाट, लेणी पर्यटनात- मानमोडी लेणी, भूत लेणी, तुळजा या व इतर अनेक प्रसिध्द पर्यटन स्थळांची माहिती या पुस्तकातून पर्यटकांना मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eसंकलन | संपादन | लेखन डॉ. लहू गायकवाड । डॉ. श्रीकांत फुलसुंदर\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67684646256962,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JUNNARTALUKAF_c84abf64-3def-4b6a-a298-a7e958586830.jpg?v=1791445814","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/junnar-taluka-paryatan-margdarshika","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}