{"product_id":"katha-saurabh","title":"Katha Saurabh (कथा सौरभ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकथा सौरभ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगप्रसिध्द कथाकारांचा संक्षिप्त परिचय - \u003cbr\u003eमोपासा : १८५० - १८९३ (फ्रान्स) गंगेच्या धीरगंभीर प्रवाहाप्रमाणे सखोल, शांत, संथ, सहजसुंदर, प्रांजळ शैली. सत्त्वशील, कणखर, निष्ठावान नायक-नायिका. चटका लावणारा शेवट.\u003cbr\u003eअॅन्टन चेकॉव्ह : १८६०- १९०४ (रशिया) माणसाच्या मनात दडलेल्या भाव-भावनांचे 'अदब' राखून केलेले सूचक परंतु अत्यंत मिश्किल असे मार्मिक वर्णन. तर कुठे अधिकाराचा गैरवापर करणाऱ्याचा 'पर्दाफाश' करणारे, दाद घेणारे, खिलाडूवृत्तीने मारलेले शब्दांचे षट्कार. कारुण्य आणि विनोद यांचा अपूर्व मिलाफ. रडता रडता हसवण्याचे कसब.\u003cbr\u003eओ. हेन्री : १८६२-१९१० (अमेरिका) 'रोजी-रोटी' च्या शोधात भटकणाऱ्यांचे सहानुभूतीपूर्ण तपशीलवार वास्तविक वर्णन. सॅटिन रिबनच्या दोन टोकांच्या साध्या घड्या पाडत पाडत शेवटी एक असा काही 'पीळ' द्यावा, की गुलाबाचं सुंदर फुल तयार व्हावं नि सुखदाश्चर्याचा धक्काच बसावा. 'सरप्राईझ ट्विस्ट' हे 'खास' वैशिष्ट्य.\u003cbr\u003eएच.एच.मन्रो 'साकी' १८७०-१९१६ (ब्रिटन) संक्षिप्त, मिश्किल कथा. काही वेळेस भयावह वर्णन, बुद्धिमत्ता-निदर्शक शेवट कथानकाला पूर्णपणे कलाटणी देणारा.\u003cbr\u003eसॉमरसेट मॉम : १८७४-१९६५ (ब्रिटन) समकालीन 'सर्वाधिक लोकप्रिय' साहित्यिकांपैकी एक. एकोणीसशे तिसाव्या दशकातील 'सर्वाधिक मानधन' पटकावण्याची प्रतिष्ठा लाभलेला. अवखळपणे वाहणाऱ्या निर्झराच्या विमल पाण्याप्रमाणे असणारे, मन प्रसन्न करणारे, खुमासदार नर्म विनोद. मनुष्य-स्वभावाचे हसत खेळत दर्शन.\u003cbr\u003eकॅथरीन मॅन्सफिल्ड : १८८८-१९२३ (न्यूझीलँड) 'त्या' काळातील न्यूझीलँडची नावाजलेली आधुनिक साहित्यिक. 'श्रीमंती' आणि 'गरीबी' ह्या दोन टोकांच्या विश्वांना समांतर ठेवून वास्तवावर झगझगीत प्रकाशझोत. स्वप्नील दुनियेचे अत्यंत तरल असे मनोरम चित्रण. मनुष्य-स्वभावाचे कंगोरे रंगवण्याचे कसब, लक्षणीय शेवट.\u003cbr\u003eरस्किन बाँड : १९३४... (भारत) सहज सुंदर, जिवंत, चित्रमय वर्णन. 'प्रतिकात्मक' अभिव्यक्ती. चुटपुट लावणारा, संस्मरणीय शेवट. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विजया देशपांडे \u003cbr\u003eप्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52145711743298,"sku":"41849","price":112.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KathaSaurabhF.jpg?v=1772883680","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/katha-saurabh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}