Akshardhara Book Gallery
Kautilyapraneet : Sushasan Aani Prashasan Tantra (कौटिल्यप्रणीत : सुशासन आणि प्रशासन तंत्र)
Kautilyapraneet : Sushasan Aani Prashasan Tantra (कौटिल्यप्रणीत : सुशासन आणि प्रशासन तंत्र)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Kirti Ram Pinjarkar
Share
Publisher: Padmagandha Prakashan
Pages: 343
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कौटिल्यप्रणीत : सुशासन आणि प्रशासन तंत्र
कौटिल्य हा प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ ऑरिस्टॉटलचा समकालीन होता. अॅरिस्टॉटलला पाश्चिमात्य विचारवंतांत 'राज्यशास्त्राचा जनक' मानले जाते. त्याने राज्यशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा दिला व त्याचे 'Politics' प्रसिद्ध केले. त्याचाच समकालीन कौटिल्य याने 'अर्थशास्त्र' लिहून त्यातूनच राजकीय विचार स्पष्ट केले. ऑरिस्टॉटलपेक्षा कौटिल्याने राजकीय विषयाचा व्यापक विचार केला. कौटिल्याने ऑरिस्टॉटलसारखे गुलामगिरीच्या प्रथेचे समर्थन कधीच केले नाही. या उलट समाजरचनेच्या तत्कालीन उतरंडीच्या निम्नस्तरावरील लोकांची विशेष दखल घेऊन त्यांच्यासाठी निरनिराळे उद्योग उपलब्ध करून, त्यांचे जीवनमान अधिक चांगले करण्याच्या योजना कौटिल्याने केल्या. त्याच्या अर्थशास्त्रातील या गोष्टींचे आपल्या ग्रंथात डॉ. कीर्ती राम पिंजरकर यांनी विशेषत्वाने विश्लेषण केलेले आहे.
लेखक. डॉ. कीर्ती राम पिंजरकर
प्रकाशक. पदमगंधा प्रकाशन
