{"product_id":"kavyaphule","title":"Kavyaphule (काव्यफुले)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकाव्यफुले\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसावित्रीबाई जोतीराव फुले या मराठीतील पहिल्या आधुनिक कवयित्री. त्यांचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह १८५४ साली प्रसिद्ध झाला. आधुनिक काव्याचे जनक म्हणून केशवसुतांना मान्यता दिली जाते; पण तत्पूर्वी मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य सामाजिक प्रश्नांवर तसेच निसर्गावर कविता करणाऱ्या सावित्रीबाई फुले याच आधुनिक मराठी काव्याच्या जनक ठरतात. केशवसुतांचा जन्मच मुळात सावित्रीबाईंचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास बारा वर्षांनंतर झाला. त्यामुळे आद्य कोण? हा प्रश्न निकालात निघतो. सावित्रीबाईंनी मराठीला मुक्त काव्याच्या प्रांगणात सोडले हे त्यांचे आद्य असल्याचे श्रेय हिरावून घेता येणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक दंभावर हल्ले करणाऱ्या, निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या कविता लोकांपासून आजवर दूर का राहिल्यात याचे उत्तर पुरोगाम्यांच्या विचित्र मानसिकतेत आहे. त्यामुळेच त्यांच्या आद्यतेवरचा अधिकार डावलला गेला. 'काव्यफुले' या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर शिव-पार्वतीचे चित्र होते. एवढेच नव्हे तर पहिली शिव-प्रार्थना केलेली असून लगेचच शिवस्तोत्रही लिहून शिवाला मनोभावे वंदन केलेले आहे. आता हे काही स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांना सहन होण्यासारखे नव्हते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया काव्यग्रंथाचे पुनर्मुद्रण माझे मित्र घनश्याम पाटील त्यांच्या 'चपराक प्रकाशना'तर्फे करत आहेत हा एक समाधानाचा क्षण आहे. जवळपास पावणेदोनशे वर्ष आधी प्रसिद्ध झालेला हा कवितासंग्रह नवीन पिढीच्या हाती जाईल. सावित्रीबाई फुलेंचा तत्कालीन स्थितीतील सामाजिक आक्रोश, जगाला ज्ञानवंत बनवण्याची तळमळ ते स्वतःच निर्मिक होण्याच्या प्रक्रियेचा सामाजिक-मानसिक प्रवास अनुभवता येईल. यातून भाषाही कशी प्रगत होत जाते याचाही आलेख अभ्यासता येणार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कवीमनाचा समाजसुधारक कसा असतो, हेही या निमित्ताने समजणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सावित्रीबाई फुले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : चपराक प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54549139423554,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KavyaphuleF.png?v=1781510381","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kavyaphule","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}