{"product_id":"khokadmal","title":"Khokadmal (खोकडमाळ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKhokadmal (खोकडमाळ)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवन्यजीव छायाचित्रकार श्री. विजय ढाकणे यांनी लहानपणापासून आजोळाच्या वाटेवर असलेल्या माळरानातून जी भटकंती केली, त्यातून जन्माला आलेले ‘खोकडमाळ' हे पुस्तक अगदी आगळेवेगळे आहे असेच म्हणावे लागेल. त्यांचे हे पुस्तक माळरानाचे अंतरंग उलगडून सांगते. मराठवाड्यात मुळातच जंगल तसे अगदी कमीच आहे. तेही आता माळरानात परावर्तित होताना दिसते. पण ही माळरानेसुद्धा किती सुंदर, आकर्षक असू शकतात याचा प्रत्यय आपल्याला लेखकाने केलेल्या हुबेहूब वर्णनातून येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाळरानांच्या भटकंतीत श्री. ढाकणे यांनी जिंतूर तालुक्यातील हंडी, वझर, सायखेडा, धानोरा, इटोली, जिंतूर शहराजवळील नेमगिरी परिसर व मंठा तालुक्यातील कीर्तापूर परिसर अगदी पिंजून काढल्याचे दिसते. या माळरानांचे त्यांनी ज्या प्रकारे बारकाईने सविस्तर वर्णन केले आहे त्यावरून प्राणी, पक्षी झाडे-झुडुपे इत्यादींच्या निरीक्षणासाठी त्यांनी किती परिश्रम घेतले आहेत याची जाणीव होत राहते. वाचकांच्या डोळ्यासमोर तो निसर्ग, ते प्रसंग प्रत्यक्ष उभे करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे पुस्तक अतिशय प्रवाही, वाचनीय आणि उत्कंठावर्धक आणि त्यासोबतच ज्ञानवर्धक अशा स्वरूपाचे खचितच झाले आहे. वाचकांच्या मनात माळरानांविषयी उत्तम प्रतिमा निर्माण करण्याचे सामर्थ्य 'खोकडमाळ' मध्ये आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विजय ढाकणे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67639233184066,"sku":null,"price":202.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/khokadmal-f.jpg?v=1790941392","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/khokadmal","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}