{"product_id":"kulfi-unhali-visheshank","title":"Kulfi Unhali Visheshank 2026 (कुल्फी उन्हाळी विशेषांक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकुल्फी उन्हाळी विशेषांक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआईबाबा उन्हाळ्यात कोकणातून आंबे आणून विकायचे. चाळीतलं अडीच खोल्यांचं घर करंड्यांनी भरून जायचं. फक्त स्वैपाकाला आणि झोपायला पुरेल इतकी जागा ठेवून बाकी सगळीकडे करंड्याच करंड्या. एकेक करून त्या उपसायच्या. आंबे आकारानुसार वेगळेवेगळे करायचे. कैऱ्या तळाशी, रंग येऊ लागलेले वर, ऑलमोस्ट पिवळे झालेले सगळ्यांत वर, मध्ये पेंढा, असे एकेक डझनाचे आठ थर लावून एकेका करंडीत आंब्याचा शेकडा भरायचा. वेताच्या रिकाम्या करंड्यांवर पाण्याचा हबका मारून त्या मागील दारच्या अनंताच्या सावलीत रचून ठेवायच्या, पेंढ्याला आणि आंब्यांना मात्र पाणी अजिबात लागता नये. त्या उबेवरच ते पिकणार असायचे. घरभर ओल्या वेताचा, पेढ्याचा, कैऱ्यांच्या चिकाचा, आणि हळूहळू पिकत जाणाऱ्या आंब्यांचा ऊबदार, मधाळ वास. मौसमातला पहिला आंबा चाखायच्या आधीच आंबा असा वस्तीला यायचा. सुट्टीत लावलेल्या लायब्रीतल्या गोष्टीच्या पुस्तकांमध्ये तो वास विरघळत जायचा. नो उन्हाळ्याचा वास, पिकत जाणारे आंबे, कडकडीत ऊन, आणि हालात पुस्तक असल्याखेरीज खरा उन्हाळा आला, असं वाटतच नाही,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. डिस्कव्हरिंग झिरो\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52846389788994,"sku":"DISC0005","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KulfiGudiPaddwaAnkF.jpg?v=1775368925","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/kulfi-unhali-visheshank","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}