Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Live In Relationship (लिव्ह इन रिलेशनशिप)

Live In Relationship (लिव्ह इन रिलेशनशिप)

Regular price Rs.765.00
Regular price Rs.850.00 Sale price Rs.765.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shrikant Dalvi

Publisher: Srujansanvad Prakashan

Pages: 480

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Live In Relationship (लिव्ह इन रिलेशनशिप)

लिव्ह इन रिलेशनशिप 

श्रीकांत दळवी यांची 'लिव्ह इन रिलेशनशिप' ही एका वेगळ्या वाटेवरची कादंबरी आहे. तीमधील प्रत्यक्ष कथानकाचा काळ एकविसाव्या शतकातील गेल्या सात-आठ वर्षांचा असला तरी कादंबरीतील शंतनू, वृषाली, रेणू, सरला सनान्से,अजय, निधी या प्रमुख पात्रांच्या भूतकाळानेच त्यांच्या वर्तमान जीवनाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांचे जग मध्यमवर्गीय चौकटीपलीकडचे आहे. आजच्या भांडवलधारी अर्थव्यवस्थेने त्यांच्या वृत्ती घडवल्या आहेत. फॅशन डिझायनिंग, मॉडेलिंग, वस्त्रोद्योग अशा व्यवसायातल्या या माणसांना दैनंदिन आर्थिक चिंता नाहीत; मात्र या व्यवसायातील अटीतटीच्या स्पर्धेने त्यांच्या जीवनात नवे प्रश्न निर्माण केले आहेत. व्यवसाय वाढविण्यासाठी पैसा आणि स्त्रीचा वापर केल्याने व्यक्तिजीवन कसे ढवळून निघते व वृषाली, रेणू आणि शंतनूच्याच नव्हे तर सरलाच्या जगण्याचीही शोकांतिका कशी होते याचा प्रत्यय ही कादंबरी देते.
लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय इथे अजय-निधी हे तरुण-तरुणी निवडत नाहीत, तर त्यांच्या मागच्या पिढीतील शंतनू-रेणू आणि नंतर शंतनू - वृषाली निवडतात. का?
लेखकाचे निवेदन, भाष्य, लांबलचक वर्णने यात नाहीत. संवादबहुलता हे तिचे वैशिष्ट्य ठरावे. कथानकातील रहस्य, गुन्हेगारी, पुरुषी लैंगिकता, तरुण- तरुणींतील सहज व अनावर ओढ अशा अनेक छटांमुळे कादंबरी वाचनीय झाली आहे.

लेखक: श्रीकांत दळवी 
प्रकाशक: सृजनसंवाद प्रकाशन 

View full details