Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Lok jaivavividhata nondvahi By Madhav Gadgil (लोक जैवविविधता नोंदवही)

Lok jaivavividhata nondvahi By Madhav Gadgil (लोक जैवविविधता नोंदवही)

Regular price Rs.99.00
Regular price Rs.110.00 Sale price Rs.99.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Madhav Gadgil

Publisher: Vanarai Prakashan

Pages: 72

Edition: Latest

Binding: paper back

Language:Marathi

Translator: -----

लोक जैवविविधता नोंदवही 

जैवविविधता म्हणजे केवळ झाड-झाडोटा, पशू-पक्षी, कीटक इत्यादींचे निरनिराळे प्रकार एवढेच नव्हे; तर प्रत्येक प्रजातीमधील जनुकीय फरक जसे की, एकाच पिकाचे वेगवेगळे वाण, पशुधनाच्या विभिन्न जाती यांचीदेखील जैवविविधतेमध्ये गणणा होते. जैवविविधतेची व्याप्ती तलाव, समुद्र, जंगल, वाळवंट, माळराने यांसारख्या नैसर्गिक अधिवासांपर्यंतही पसरली आहे. या जैवविविधतेच्या जाळ्याने संपूर्ण सजीवसृष्टी बांधली गेली असून त्यावर आपलेही अस्तित्व अवलंबून आहे. अशा या अमूल्य जैवविविधतेचा ऱ्हास हे जगासमोर एक मोठे आव्हान बनले आहे. संपूर्ण भारतातही, विशेषत: जैवविविधतेने संपन्न असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पूर्व हिमालयाचा परिसर, मेघालयाच्या डोंगररांगा आणि लगतच्या ईशान्य भारतामध्ये जैवविविधतेच्या ऱ्हासाची तीव्रता प्रकर्षाने जाणवते. स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, शाश्वत वापर आणि जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशांतून 2002 मध्ये भारतात जैवविविधता कायदा मंजूर झाला. या उद्देशांच्या पूर्ततेची जबाबदारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यासाठी या सर्व संस्थांच्या स्तरावर 'जैवविविधता व्यवस्थापन समित्या' स्थापन करणे सदर कायद्यानुसार बंधनकारक आहे. या समित्यांनी दरवर्षी आधुनिक माहिती-तंत्रज्ञानाच्या वापरातून एका सुव्यवस्थित डेटाबेसमध्ये स्थानिक जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण लोक-जैवविविधता नोंदवही (PBR) स्वरुपात संकलित करणे, अपेक्षित आहे. या माहितीचा उपयोग जैवविविधतेचे संवर्धन, व्यवस्थापन करण्यासाठी आणि पर्यावरणावरील परिणामांवर देखरेख ठेवण्यासाठी होईलच. शिवाय पर्यावरणपूरक विकासाची स्थलानुरूप ध्येय-धोरणे ठरवण्यासाठीचा हा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरू शकेल.

लेखक : माधव गाडगीळ 
प्रकाशन : वनराई प्रकाशन 

View full details