Akshardhara Book Gallery
Maage Valun Paahtana (मागे वळून पाहताना)
Maage Valun Paahtana (मागे वळून पाहताना)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Jayant Naarlikar
Publisher: Shrividya Prakashan
Pages: 72
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मागे वळून पाहताना
भारतीय स्मितेचा मानबिंदू आणि जागतिक कीर्तीचे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या आयुष्यातील रेशीमस्पर्शी आठवणींचा ठेवा, म्हणजे हे पुस्तक आहे. त्यांच्या स्मृतिपटलावर उमटलेल्या निवडक क्षणांचे चित्रण यामध्ये आहे.
विशेष म्हणजे, जयंत नारळीकर यांच्या नातवाच्या प्रेमळ आग्रहाखातर त्यांनी लिहिलेल्या ब्लॉग्जचे हे संकलनात्मक पुस्तक आहे, मात्र, हे केवळ संकलन नाही ; तर लेखकाच्या विलक्षण प्रतिभेची गुंफण झालेला आठवांचा अनेकपदरी गोफ आहे. त्यात त्यांच्या कौटुंबिक आठवणींसह देश-परदेशातल्याही आठवणी वाचकांसमोर उलगडतात. अतिशय हलक्याफुलक्या लेखनशैलीतले हे लेखन सूक्ष्म-तरल अशा वैचारिक धाग्यासह प्रगल्भ वाचनानुभव देते. आपणसुद्धा त्याच्या आठवणींचा हा प्रवास केवळ अनुभवत नाही : तर जणूकाही प्रत्यक्ष जगतो. त्याचप्रमाणे, जयंत नारळीकर यांच्या आयुष्यातील आठवणींचा हा गोफ वाचकांना अंतर्मुख करणाराही आहे.
प्रकाशक. श्रीविद्या प्रकाशन
लेखक. डॉ. जयंत नारळीकर
