{"product_id":"mad-in-love","title":"Mad in love (मॅड इन लव्ह)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eमॅड इन लव्ह\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअत्यंत उत्कंठावर्धक सायकॉलॉजिकल थ्रिलर प्रेमकथा, जी वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल ! तळकोकणातल्या समुद्रकाठच्या गावातून आलेला सुमेध सावंत आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त गावातून आलेली कस्तुरी धानोरकर. एका नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दोघांची भेट होते आणि त्यांच्यात निखळ मैत्री बहरते. पुढे या मैत्रीचे रूपांतर यशस्वी प्रेमकथेत होईल का ? मोठी स्वप्न उराशी बाळगून ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या सुमेध-कस्तुरीचे आयुष्य प्रेमामुळे कोणते धक्कादायक वळण घेते ? असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या आणि प्रत्येक परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या सुमेधच्या हातून अचानक सात खून का घडतात? त्याने आठव्या व्यक्तीला जीवदान का दिले? त्याच्या जीवावर उठलेली एक गूढ व्यक्ती नेमकी कोण आहे? या साऱ्या प्रश्नांचा वेध घेत ही कादंबरी पोलीस तपासामुळे अधिकच उत्कंठावर्धक आणि चित्तथरारक होते. सध्याच्या 'हुकअप्स' आणि 'सिच्युएशनशिप'च्या जंजाळात निखळ, निरागस, पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ नव्याने सांगणारी ही कादंबरी. आपलं प्रेम मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक मस्ट रीड चित्तथरारक कादंबरी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक : अक्षय टेमकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : वारी पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e \u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52951054123330,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/madinlove-f.jpg?v=1776837015","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mad-in-love","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}