{"product_id":"mahakshatriy","title":"Mahakshatriy (महाक्षत्रिय)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहाक्षत्रिय\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवुडु, नरसिंहशास्त्री हे कन्नड भाषेचे एक खूप महान लेखक आहेत. त्यांच्या तीन श्रेष्ठ कादंबऱ्यांपैकी एक आहे 'महाक्षत्रिय'. देवुडु हे सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे आवडते विद्यार्थी होते. या सृजनशील लेखकाने आपली कृती महाक्षत्रियसाठी भारतीय पुराणाची निवड केली. मूळ कथेला त्यांच्या कल्पनातीत कल्पनाशक्तीची जोड दिली. यामागे त्यांचा एकच हेतू होता की पुराणांची आपण पुन्हा सृष्टी करावी. प्रस्तुत कादंबरीमध्ये देव-दानव सगळे आहेत. पण ती कादंबरी मानवकेंद्रित आहे. मूळ कथेत त्यांनी जो बदल केला, तो फक्त हे नमूद करण्यासाठी की, मानव हा श्रेष्ठ आहे, त्याने जे काही साध्य केले ते स्वबळावर व मानवतेची सीमा न ओलांडता केले. म्हणूनच नहुष महाराज हे मानवाने मिळवलेल्या सिद्धीच्या पराकाष्ठेचे प्रतीक आहेत. वैदिक संस्कृतीवर देवुडुंचा गाढा विश्वास होता. त्यांची ही कादंबरी म्हणजे त्यांच्या अंतःशक्तीचे निरूपण आहे. 'महाक्षत्रिय' या कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे- \"आपल्या इतिहास व पुराणांचे अध्ययन करून, आजच्या पिढीला आपण खूप काही सांगण्यासारखे आहे. त्यातील साऱ्या गोष्टी समंजसपणे सांगणारे, त्यांचे विवेचन मांडणारे पुण्यवान नागरिक खूप मोठ्या संख्येने पुढे येऊ देत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नरसिंहशास्त्री देवूडू \u003cbr\u003eअनुवादित लेखक. विजयालक्ष्मी रेवणकर \u003cbr\u003eप्रकाशक. मिहाना पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52280648532290,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MahakshatriyF.jpg?v=1773487743","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mahakshatriy","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}