{"product_id":"mahatma-gandhi-aani-tyancha-bharatiy-sangharsh","title":"Mahatma Gandhi Aani Tyancha Bharatiy Sangharsh (महात्मा गांधी आणि त्यांचा भारतीय संघर्ष)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहात्मा गांधी आणि त्यांचा भारतीय संघर्ष\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'राष्ट्रपिता' महात्मा गांधींनी पाहिलेली मोठ्या कार्याची स्वप्ने, सामाजिक मूल्यांचे त्यांना असलेले भान आणि अहिंसक प्रतिरोधाचे त्यांचे तत्त्वज्ञान दक्षिण आफ्रिकेत घालविलेल्या दोन दशकांत कसे फुलले व पोसले गेले आणि त्यांना 'महात्मा' म्हणून डोक्यावर घेणाऱ्या भारताने सामाजिक उत्क्रांतीच्या ध्येयमार्गावर थोडी वाटचाल करून, त्यांची परीक्षा कशी घेतली याचे काळजाचा ठाव घेणारे वर्णन जोसेफ लेलिव्हेल्ड यांनी सुस्पष्ट आणि अभूतपूर्व बारकाव्यांनिशी केले आहे. एक प्रतिष्ठित वकील, जो राजकीय व सामाजिक कृति कार्यक्रमांना वाहून घेताना पंचा गुंडाळलेला संन्यासी कसा झाला, याचे मनोज्ञ दर्शन या पुस्तकात घडते. या निःस्वार्थी नेत्याच्या आयुष्यात त्याने दीर्घकाळापासून उभारलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान शेवटी भारताच्या विभाजनात, पाकिस्तानच्या निर्मितीत कसे झाले आणि जाति-संहाराच्या रक्तपाताने डागाळलेला हा प्रवास अखेरीस त्यांच्या स्वतःच्या हत्येपाशी जाऊन कसा थांबला, याचे हेलावून टाकणारे वर्णन पुस्तकात आहे. अर्थात भारत आणि भारतीय राजकारण्यांनी गांधींना त्यांच्या नावापुढे 'राष्ट्रपिता' ही उपाधी लावून मोठ्या तत्परतेने मखरात बसविले; पण त्यांची शिकवण त्यांनी अंगीकारली नाही, ही खंत आहेच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. जोसेफ लेलीव्हेल्ड \u003cbr\u003eअनुवादित लेख. मुक्ता देशपांडे \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52103934607682,"sku":null,"price":445.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MahatmaGandhiAaniTyanchaBharatiySangharshF.jpg?v=1772175585","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mahatma-gandhi-aani-tyancha-bharatiy-sangharsh","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}