{"product_id":"mahatma-jyotirao-phule","title":"Mahatma Jyotirao Phule (महात्मा जोतीराव फुले)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMahatma Jyotirao Phule (महात्मा जोतीराव फुले)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसर्व मानव प्राणी एका ईश्वराची लेकरे असून, तो सर्वावरच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसारखे प्रेम करतो. आपआपसांत जातीभेद माजवून ऊच निचत्वाच्या जोरावर ब्राह्मणांनी केवळ सोवळ्या ओवळ्याचे बंड माजविले व कपटाच्या जोरावरच ते इतरांचे देव बनले. कष्ट न करता स्वतःचा तळीराम गार करण्यासाठी भिक्षुकशाहीने देशातील अखिल जनतेत धर्मभोळेपणा उत्पन्न केला. आपली चैन निरंतर चालू राहावी म्हणून जनतेचे शिक्षण तोडून तिला अज्ञानात ठेवण्याची कोशीश केली. कथा- शास्त्र व पोथ्या पुराणे रचून त्याद्वारे लोकांचा स्वाभिमान मारला. जातिभेदाचे अमेद्य तट पाडून समाजाची छकले पाडली. आपले स्वामित्व कायम रहावे म्हणून जातीजातींत ऊच नीचपणाचे आपपर भाव उभे करून ठेविले. आपण नीच आहोत असा प्रत्येकात भास उत्पन्न केला व तसे मानण्याचे प्रत्येकात समाधान उत्पन्न केले! अशा प्रकारे भिक्षुकशाहीने स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदु समाजाची बुद्धी मारली, स्वाभिमान मारला व बल नष्ट केले. पेशवाईत तर या गोष्टी थेट कळसास जाऊन पोहोचल्या. याचा परिणाम साहजिकच असा घडून आला की, देशातील मराठी स्वराज्य बुडून परकीय अशा इंग्रजी राजसत्तेचे पाय या देशाला लागले. देशाच्या पारतंत्र्याचे हे मूळ जोतीरावांच्या चांगलेच लक्षात आले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: पंढरीनाथ पाटील \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67696878518594,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mahatmajyotiraophule-f_aae3b49a-d73f-46e3-8690-3d4ea1728f52.jpg?v=1791538126","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mahatma-jyotirao-phule","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}