{"product_id":"manasshastra","title":"Manasshastra (मानसशास्त्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमानसशास्त्र :\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआंतरवैयक्तिक नातेसंबंध आणि ताण-व्यवस्थापन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"माणूस हा सामाजिक प्राणी आहे\" हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. \u003cbr\u003eपण सामाजिक असणे म्हणजे नेमके काय? आपल्या आयुष्यातील सुखाचा आणि दुःखाचा \u003cbr\u003eबराचसा भाग हा आपल्या 'नातेसंबंधांवर' अवलंबून असतो. मग ते नाते मैत्रीचे असो, \u003cbr\u003eकुटुंबातील असो किंवा कामाच्या ठिकाणचे. हेच नातेसंबंध समजून घेण्याचा एक छोटासा \u003cbr\u003eप्रयत्न म्हणजे हा ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा ग्रंथ लिहिण्यामागचा मुख्य उद्देश केवळ शैक्षणिक माहिती देणे हा नसून, वाचकांना \u003cbr\u003eत्यांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षांकडे आणि तणावाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन \u003cbr\u003eदेणे हा आहे. आपण नात्यांच्या कोणत्या टप्प्यावर आहोत? आपल्या संवादशैलीत काय \u003cbr\u003eत्रुटी आहेत? आणि ताणतणावाच्या परिस्थितीत आपण कोसळून न पडता 'साधक वर्तन' \u003cbr\u003eकसे करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या प्रकरणांमधून केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकंदरीत, हा ग्रंथ केवळ सैद्धांतिक माहिती न देता मानवी वर्तणुकीचे व्यावहारिक \u003cbr\u003eविश्लेषण करतो. हा ग्रंथ मानसशास्त्राचे विद्यार्थी, समुपदेशक आणि मानवी संबंधांत \u003cbr\u003eरस असणाऱ्या प्रत्येकासाठी दीपस्तंभासारखा ठरेल, अशी खात्री वाटते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रा. केशव गाडेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55911809810754,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MANASSHASTRAF.jpg?v=1786627573","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/manasshastra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}