{"product_id":"manavsrushitcha-vikaskram-ani-dharma","title":"Manavsrushitcha Vikaskram Ani Dharma (मानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवर्तमानात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विशिष्ट धर्मसमूहाच्या भावना दुखावल्या जातील म्हणून धर्मचिकित्सा टाळली जाते. मात्र धर्मचिकित्सेतूनच जागतिक स्तरावर मानवतावादाला सार्वभौमत्व प्राप्त करून देणारी मूल्ये पुरस्कारली गेली असून भारतातदेखील गेल्या दोन शतकांत सतीप्रथा बंदी, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता निवारण असे कालसुसंगत सामाजिक परिवर्तन घडून आलेले दिसते. धर्मचिकित्सेतूनच धर्माचे स्वरूप मानवताधिष्ठित होऊ शकते. म्हणूनच समाजाला कृतिप्रवण करणारी, विधायक विज्ञाननिष्ठ विचारधारेतून केलेली धर्मचिकित्सा ही आजघडीला महत्त्वाची ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'मानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म' या अभ्यासातून हे दिसून येते की, कोणताही संघटित धर्म समाजाचे दीर्घकाळ सुव्यवस्थापन साधू शकत नाही. तसे पाहिले तर धर्माच्या मक्तेदारांनीच धर्मातील मूळ कल्याणकारी तत्त्वांना, धर्मश्रद्धांना आक्रसून टाकलेले दिसते. धर्मसत्तेतील लोकच आपल्या स्वार्थासाठी या तत्त्वांची मोडतोड करतात हे इतिहासातील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. प्रेम, करुणा, सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या जीवनमूल्यांतून आकारास येणारा मानवधर्मच माणसाला नीतिमान व विवेकशील बनवू शकतो. त्याला प्रागतिकतेकडे नेऊ शकतो. आशा आहे... धर्म व विज्ञान यांमधील संघर्ष क्रमाक्रमाने नाहीसा होईल, वर्तमानातील धुमसतेपण निरस्त होईल, माणूसपण आकार घेईल, बहुसांस्कृतिक माणूस एकत्वाच्या सूत्रात जोडला जाईल आणि अखंड शांती-समाधान देणारा विश्वधर्माचा प्रवास सुकर होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e (मनोगतातून)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : डॉ.योगिता पिंजरकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : लोकवाड्मय गृह \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54956673204546,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ManavshrushtichavikaskramaanidharmF.png?v=1783317857","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/manavsrushitcha-vikaskram-ani-dharma","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}