{"product_id":"manohar-ambanagari","title":"Manohar Ambanagari \t(मनोहर अंबानगरी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eManohar Ambanagari     (मनोहर अंबानगरी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजपर्यंत मुकुंदराज व त्यांच्या परंपरेतील ग्रंथकारांकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. मराठी वाङ्मयेतिहासात ह्या ग्रंथकारांचे केवळ नामोल्लेख तेवढे आढळतात. विवेकसिंधूचा कित्ता डोळ्यासमोर ठेवून आजपर्यत तीस ग्रंथ लिहिण्यात आले आहेत, पण त्यांचे साक्षेपपूर्ण विवेचन अद्यापही झाले नाही. एवढेच नव्हे तर महाभाष्य व विवेकामृतरूपाने मूळ विवेकसिंधूला संस्कृतरूप देण्यात आले. विशेषतः विवेकामृताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ह्या ग्रंथामुळे विवेकसिंधूच्या पाठसंशोधनालाही साह्य होते. कै. कृ.पां. कुळकर्णी यांनी विवेकामृताचा अधिक विचार केला असता तर कितीतरी दुर्बोध व संदिग्ध पाठान्तरांचा प्रश्न सुटला असता! विवेकसिंधूच्या बऱ्याच पोथ्या आता उपलब्ध झाल्या आहेत. त्या सर्वच विचारात घेऊन पुनः एकदा विवेकसिंधूच्या पाठसंशोधित चिकित्सक आवृत्तीचा प्रयत्न करणे जरूर आहे. ह्या ग्रंथाच्या बाबतीत नेहमी भाषेचा प्रश्न पुढे करण्यात येतो. ग्रंथाच्या भाषेचे अर्वाचीनकरण अतोनात झाले हे खरे. पण तसे ते ज्ञानेश्वरीचेही झालेले आहे. मी आजपर्यत ज्ञानेश्वरीच्या असंख्य हस्तलिखित प्रति पाहिल्या आहेत. त्यामधील अठराव्या शतकात लिहिण्यात आलेल्या प्रतींची भाषा तर बदलून गेलेली आहे. अशा परिस्थितीत मिळतील तितक्या प्रती पाहूनच मूळ भाषारूपांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरते. पण विवेकसिंधूच्या भाषेसंबंधात अजून एका प्रश्नाचा विचार करणे अपरिहार्य ठरते. तो म्हणजे मुकुंदराज हे मूळचे काशीचे होते काय ? पूर्वायुष्यात ते ज्योतिषि होते व त्यांची काशीला रघुनाथाची भेट झाली होती, हे लक्षात घंतले तर ते मूळचे काशीचे व पर्यायाने उत्तर भारतीय ठरतात; व त्यांना माळवी ब्राह्मण समजणारी एक मौखिक परंपरा अद्यापही आहे.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: म.रा.जोशी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67979083579714,"sku":"APRA0026","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/manoharambanagari-f.jpg?v=1793447692","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/manohar-ambanagari","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}