Akshardhara Book Gallery
Maze BARC Che Diwas ( माझे ‘बीएआरसी’ चे दिवस )
Maze BARC Che Diwas ( माझे ‘बीएआरसी’ चे दिवस )
Share
Couldn't load pickup availability
Author: Suresh Havare
Publisher: Rohan Prakashan
Pages: 187
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
माझे ‘बीएआरसी’ चे दिवस
एका साध्या खेड्यातून आलेला मुलगा आपल्या हुशारीच्या, जिद्दीच्या आणि कष्टांच्या बळावर भारतातल्या प्रमुख संशोधन संस्थेत, ‘भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये (बीएआरसी) वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ होतो; त्याचा थक्क करणारा आणि प्रेरक प्रवास म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकातून डॉ. हावरे यांचा अडचणींकडे आव्हान म्हणून पाहण्याचा, त्यांचं संधींमध्ये रूपांतर करण्याचा दृष्टिकोन विशेषत्वाने दिसून येतो. तसंच ज्ञान आणि संशोधन यांबद्दल त्यांना असलेली उत्कट आवड पदोपदी व्यक्त होते. आणीबाणीचा काळ, शैक्षणिक संस्थांमध्ये व्यतित केलेले दिवस, बीएआरसीमधलं कार्य आणि पहिल्या भारतीय आण्विक पाणबुडीकरता केलेलं संशोधन व काम, तसंच हिमालयातला प्रवास यांसारख्या कितीतरी गोष्टी ते वाचकांना कथन करतात. त्यातून त्यांची जीवनाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिसून येते.
प्रकाशक : रोहन प्रकाशन
