{"product_id":"mhatara-paus-aani-thadaga","title":"Mhatara Paus aani Thadaga (म्हातारा पाऊस आणि थडगं)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eम्हातारा पाऊस आणि थडगं \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकृष्णा हा मातीतला, शुद्ध लेखक आहे. अतिशय संवेदनशील निरीक्षणशक्ती लाभलेला. \u003cbr\u003eनिसर्ग, नाती ह्यांवर नितळ माया असणारा. मातीत त्याच्या कलेची लेखनाची मूळं घट्ट रुजली \u003cbr\u003eआहेत. त्याच्या 'म्हातारा पाऊस’ या दोन अंकी नाटकात सुलू आणि तिचा नवरा हे\u003cbr\u003eउतारवयातील जोडपं, त्यांच्या जगण्याचा पट आपल्यापुढे उलगडतात-कधी हसत खेळत,\u003cbr\u003eएकमेकांना चिमटे काढत, स्मरणरंजनात मशगुल होत आताच्या वास्तवाचा तडाखा थोडा \u003cbr\u003eसौम्य करू पाहत आहेत. आज त्यांचा पाऊस त्यांच्याच इतका समजूतदार, निर्मळ, \u003cbr\u003eआणि आज्यासारखा जाणता झाला आहे. हा मायाळू पाऊस, प्रेक्षक, वाचकांना हेलावून \u003cbr\u003eजाईल ह्यात शंका नाही. 'थडगं' हा दीर्घांक लिहिताना, जितका सखोल तो तरुण, \u003cbr\u003eकलाकार मुलाचे भावविश्व दाखवतो तितक्याच खोलीने तो बापाचे, आज्याचे अंतरंगही \u003cbr\u003eउलगडू शकतो. शेतातली एक रात्र एवढाच ह्या दीर्घांकाचा आवाका नाही; तो जो \u003cbr\u003eअवकाश आपल्यापुढे उभा करतो त्यात तो एक फार मोठा प्रवास मांडतो-तो जो \u003cbr\u003eगाभ्याला स्पर्श करतो तो विलक्षण आहे. अतिशय सेंद्रिय, अस्सल वाणाचे आणि \u003cbr\u003eगहिऱ्या समजुतीचे लेखन कृष्णाकडून निरंतर घडत राहो...\u003cstrong\u003e.- चिन्मयी सुमीत\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : कृष्णा यमुना विलास वाळके \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54995429753154,"sku":null,"price":202.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MHATARAPAUSF.jpg?v=1784294849","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/mhatara-paus-aani-thadaga","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}