Akshardhara Book Gallery
Natak Nawacha Tarafa (नाटक नावाचा तराफा)
Natak Nawacha Tarafa (नाटक नावाचा तराफा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Atul Pethe
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 158
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator: ----
नाटक नावाचा तराफा
नाटक नावाचा तराफाअस्वस्थ कालखंडाचा अनुभव घेत असताना त्याची नोंद आपण आपल्या कुवतीनुसार
करून ठेवली तर त्या त्या काळात जगाच्या एका कोपऱ्यात काय काय घडत होतं याचा अभ्यास करणाऱ्यांना
त्यांचा उपयोग होऊ शकतो. हीच भावना मनात जागी ठेऊन ज्येष्ठ नाटककार अतुल पेठे यांनी आपल्या
काळाचा पट उलगणारं आणि त्याचा अन्वयार्थ लावणारं चिंतनशील लेखन वेळोवेळी केलेलं आहे. त्यातल्या
निवड लेखांचा संग्रह म्हणजे ‘नाटक नावाचा तराफा’ हे पुस्तक होय. एका नाटककाराच्या अंतरंगात
उसळलेल्या वादविवादसंवादाच्या लाटांचा अनुभव देणारं हे पुस्तक म्हणजे एखादा नाटककार एखादं
नाटक करतो म्हणजे काय करतो आणि त्यावेळी त्यांच्या मनात जी काही उलथापालथ होते त्याची रिस्टर
स्केलवर उमटलेली नोंद होय. त्यामुळेच सर्वसामान्य वाचकांसाठीही हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. कारण
आपण आपल्या भोवतालाकडे कसं पाहावं? अनुभवाला येणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ कसा आणि काय लावावा?
याचं दिग्दर्शन, मार्गदर्शन हे पुस्तक करतं. म्हणूनच ते प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवं असं आहे.
लेखक : अतुल पेठे
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
