{"product_id":"navalai-vidnyan-sankalpana","title":"Navalai Vidnyan Sankalpana (नवलाई विज्ञान संकल्पना)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eनवलाई विज्ञान संकल्पना \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e२००६ साली त्यावेळचे लोकसत्तेचे संपादक श्री. कुमार केतकर यांच्या प्रेरणेने, 'कुतूहल' हे सदर सुरु झाले. त्याला आता २० वर्षे होऊन गेली आणि यंदाचे एकविसावे वर्ष आहे. हे सदर अखंडपणे चालू असून ते वाचकप्रिय आहे. या सदरातील माहिती ग्रामीण भागातील शाळात प्रार्थना झाल्यावर सार्वजनिकरित्या वाचून दाखवली जाते. अनेक विद्यार्थी याचे वर्तमानपत्रातील कात्रण काढून ते चिकट बुकात डकवून ठेवतात. स्पर्धा परीक्षांना बसणा-या मुलांना ही माहिती उपयोगी पडत असल्याने साहजिकच यातील माहिती अद्ययावत आणि अचूक असण्याची जबाबदारी मराठी विज्ञान परिषदेवर येऊन पडते व मराठी विज्ञान परिषद त्याला पुरी पडली आहे. विज्ञानातल्या, उर्जा, सजीव, अंतर, जीवाणू वेग, त्त्वरण, मोजमापन, वहन, परासारण वगैरे ज्या अनेक संकल्पना आहेत, त्यांच्या व्याख्या पाठ्यपुस्तकात एकेका ओळीत दिलेल्या असतात. त्या मुले पाठ करतात आणि परीक्षेत लिहितात. त्या त्यांना समजलेल्या नसतात, ना शिक्षक त्यांना समजतील अशा समजावून देतात. विज्ञानाचा सर्व डोलारा या संकल्पना समजण्यावर अवलंबून असतो. त्यामुळे मराठी विज्ञान परिषदेने पहिल्याच वर्षी या संकल्पनांवर लेख लिहिले. ते सामान्यांना तर समजलेच पण महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस महासंचालक असलेले व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी झालेले श्री. कृ. पां. मेढेकर यांनी पत्र लिहून माझ्या मनातीलही काही संकल्पना या सदराच्या वाचनाने स्पष्ट झाल्या अशी कबुली दिली. हे पुस्तक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना भावेल अशी आशा करतो. अ. पां. देशपांडे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. डॉ. बाळ फोंडके \/ श्री अ पां  देशपांडे \u003cbr\u003eप्रकाशक. ग्रंथाली\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52977168580930,"sku":"GRAN0057","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NavalaiF.jpg?v=1777358457","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/navalai-vidnyan-sankalpana","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}