{"product_id":"neelkanth","title":"Neelkanth (नीलकंठ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनीलकंठ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनप्रवासाच्या नानाविध वाटांवर कित्येक माणसं भेटतात. निव्वळ चेहऱ्यावरून तळातला खळाळ हाती लागणं तसं कठीणच! व्यक्ती-व्यक्तींमधले परस्परसंबंध, त्यांच्या वागण्याच्या विलक्षण तह, भावनांचे कंगोरे आणि कळत-नकळत उफाळणारे तरंग या साऱ्याचा मनोज्ञ वेध नीलकंठ कथासंग्रहातून प्रतीत होत राहतो. कायमचं अगम्य असं स्त्री-पुरुष नातं ! प्रेम हा एकच शब्द, पण त्याच्याही अनंत छटा ! नियतीच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणारं आयुष्य आणि त्यात अडकलेलं अवघं मनुष्यजीवन ! अशी सगळी घट्ट वीण अलवार उसवून दाखवण्याची लेखिकेची देखणी धडपड चैती, बळीचं तळं, वादळ, मेड फॉर इच अदर यांसारख्या कथांमधून जाणवत राहते. उत्कंठा जागवणाऱ्या, आतला तळ ढवळून टाकणाऱ्या, भ्रम आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर रेंगाळायला लावणाऱ्या या कथा म्हणजे एक तरल अनुभूती !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभिप्राय स्त्री-पुरुष आणि नियती यांचे रंग दाखवणाऱ्या कथा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e           लोकप्रभा २५-१-२०१९\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सर्वच कथा, आतापर्यंत न स्पर्श झालेल्या विषयांच्या आहेत. प्रत्येक कथा वाचनीय तर आहेच अशा कथा या अगोदर वाचनांत कधीही आलेल्या नाहीत. आपला वाचक मित्र भालचंद्र लेले\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : स्नेहल जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943205982530,"sku":null,"price":168.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/NeelkanthF.png?v=1782969194","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/neelkanth","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}